सेंट पॉल स्कूल या शाळेसमोरील एक वाळलेले झाड असून या झाडामुळे अपघाताची शक्यता असताना हि शाळेने हे झाड तोडलेले नाही .मागील काही दिवसात याच झाडाची एक फांदी एका मोटार सायकलच्या पुढील भागावरती पडून गाडीचे नुकसान झाले आहे .या शाळेसमोरुन जाणाऱ्या वाहनांना हि धोका असून हे झाड बरोबर शाळेच्या समोरच असल्याने शाळेतील येणाऱ्या विद्यार्थी व पालक भीत भीतच शाळेत प्रवेश करत असतात .याच झाडाच्या वाळलेल्या फाद्या पडून विद्यार्थी जखमी होण्याची भीती असून हे झाड शाळेने त्वरित तोडून टाकावे अशी नागरिकांनमधून मागणी होत असताना शाळा मात्र या कडे दुर्लक्ष करीत आहे .
सेंट पॉल स्कूलच्या समोरील झाडामुळे अपघाताची शक्यता
RELATED ARTICLES