Sunday, August 10, 2025
HomeUncategorizedसुषमा अंधारे यांना घेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश

सुषमा अंधारे यांना घेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना महाडमधून घेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याची घटना घडली आहे. ज्यावेळी हा अपघात झाला तेव्हा सुषमा अंधारे ह्या हेलिकॉप्टरमध्ये नसून केवळ पायलट हेलिकॉप्टर मध्ये होता. हेलिकॉप्टर क्रॅश झाल्यानंतर पायलट असून सुखरूप वाचला असून मोठी दुर्घटना टळली आहे. तर हेलिकॉप्टर क्रॅश होण्याचे कारण अद्याप समोर आले नाही. सुषमा अंधारे आज सकाळी महाडमधून बारामतीकडे जाणार होत्या त्यासाठी त्यांना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आले होते. पण हेलिकॉप्टर हेलिपॅडवर उतरताना अचानकपणे पायलटचे नियंत्रण सुटल्यामुळे हेलिकॉप्टर कोसळले आणि यामुळे सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला. यावेळी सुषमा अंधारे या तिथेच उपस्थित होत्या. दरम्यान, या अपघातात सर्वजण सुखरूप असल्याची पुष्टी करत, सुषमा अंधारे यांच्यासह पायलट, अॅसिस्टंट तथा माझा लहान भाऊ विशाल गुप्ते आदी सर्वजण सुखरुप असल्याची माहिती सुषमा अंधारे यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments