सातारा येथील वकील राममोहन खारकर यांच्यावरील शाहूनगर परिसरात शनिवार दिनांक १२ मार्च रोजी रात्री १०.३० ते ११. ०० च्या सुमारास जबरी प्राणघातक हल्ला करणेत आला . त्यात त्यांच्या उजव्या डोळ्यावर घाव झाल्याने तो कायमस्वरूपी निकामी झाला आहे . अशाप्रकारे त्यांना गंभीर दुखापत झाली असल्याने या घटनेचा निषेध सातारा जिल्हा न्यायालयामध्ये झालेल्या प्रकाराबदल निषेध सभा घेण्यात अली . या सभेस सर्व वकील संघटनेच्या सभासदांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या व झालेल्या घटनेचा निषेध नोंदवला आहे . सातारा न्यायालयातील संपूर्ण काम बंद ठेवण्यात आले आहे . तसेच या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी ठराव हि घेण्यात आलेला आहे . सातारा न्यायालय व सातारा जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयातील वकील सभासदांनी कामकाज बंद ठेवले होते .
या घटनेच्या निषेधासाठी सातारा न्यायालयामध्ये झालेल्या निषेध सभेचे प्रस्ताविक सातारा वकील संघटनेचे उपाध्यक्ष चंद्रकांत बेबले यांनी केले . त्यावेळी त्यांनी या घटनेबाबत सविस्तर माहिती दिली तसेच घडलेल्या घटनेचा मागील दोन दिवसाचा आढावा सभागृहास दिला व सुरु असलेल्या तपासाची माहिती सभागृहास दिली . यानंतर वकील नितीन वाडेकर ,शामप्रसाद बेगमपुरे ,पी .एन . पवार ,सुभाष देशमुख ,मिलिंद ओक ,महेश कुलकर्णी ,प्रशांत खामकर ,आदी वकिलांनी आपल्या भावना व्यक्त करून आपले मत मांडले .
सर्व वकील संघटनेच्या सभासदांनी घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करून न्यायालयीन कामकाजापासून एक दिवसासाठी अलिप्त राहणेचा निर्णय केला . याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी ,जिल्हा पोलीस अधीक्षक यांना लेखी निवेदनाद्वारे या घटनेकडे गांभीर्याने पाहणेसाठी विनंती केली आहे . सध्या वकिलांवरील हल्ले होण्याच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे . तरी याकडे राज्यशासनाने देखील गांभीर्याने पाहून वकिलांना सरक्षण देणारा कायदा निर्माण करणेत यावा यासाठी देखील मागणी केलेली आहे . तसेच या घडलेल्या घटनेमधील दोषी आरोपीना लवकरात लवकर पकडण्यात यावे व त्यांचेवर जास्तीजास्त कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी असे निवेदना माध्यमातून करण्यात आली आहे . या घटनेचा तीव्र निषेध सातारच्या जिल्हा न्यायाधीस मंगला घोटे यांनी केला . सभेस कार्यकारिणीतील वकील स्वाती गव्हाणे ,पृथ्वी पवार ,अनुप लकडे ,आदित्य पाद्य ,योगेश काळंगे ,करण पालकर ,ऋषाली गाढवे ,पूया निषेध सभेचा ठराव वकील सुखदेव पाटील यांनी मांडला त्यास सभासदांनी अनुमोदन दिले . तर प्रस्तावित वकील चंद्रकांत बेबले यांनी केले . उपस्थित असलेल्या सभासदाचे आभार वकील संभाजी कदम यांनी मानले . नम कुंभार ,पेंढारी व सभासद उपस्थित होते .



