साताऱ्यातून शरद पवार गटाने शशिकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. साताऱ्यातून शरद पवार कोणाला उमेदवारी देणार? याकडे सगळ्यांच लक्ष लागलं होतं. साताऱ्याचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी प्रकृतीच्या कारणास्तव माघार घेतली. त्यानंतर उमेदवार कोण? अशी चर्चा सुरु झालेली. बारामतीप्रमाणे साताऱ्याचा कौल काय? याकडेही राज्याच लक्ष आहे. साताऱ्यात शशिकांत शिंदे यांचा सामना उदयनराजे भोसले यांच्या विरुद्ध होऊ शकतो. अजून महायुतीने साताऱ्यातून आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. शशिकांत शिंदे यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
“मी पवारसाहेब आणि साताऱ्यातील जनतेचे आभार मानतो. हा चव्हाण साहेबांच्या, पवार साहेबांच्या विचारांना मानणारा जिल्हा आहे. पक्षाच्या स्थापनेपासून सातारा जिल्हा राष्ट्रवादीच्या पाठिशी उभा राहिला आहे. माझी कोणाशी लढाई नाही” असं शशिकांत शिंदे म्हणाले. “या जिल्ह्यात शेतकरी, जनतेला अपेक्षित नेतृत्व उभ करण्याचा प्रयत्न करेन. या जिल्ह्यात अनेक प्रश्न आहेत. त्यांना आवाज उठवणारा नेता पाहिजे. काही लोकांचा आदर्श ठेवून काम करेन. चारवेळा आमदार, मंत्री झालो. कोरेगाव, जावळीच्या मतदारांनी पाठबळ दिलं” असं शशिकांत शिंदे म्हणाले.