Friday, August 8, 2025
Homeसातारासाताऱ्यातील सोनगाव तर्फमध्ये 95 लाखांची रोकड जप्त

साताऱ्यातील सोनगाव तर्फमध्ये 95 लाखांची रोकड जप्त

सध्या विधानसभा निवडणुकीचे धुमशान सुरू निवडणूक काळात अवैधरित्या रोख रकमेची वाहतूक व देवाण-घेवाण होवू नये, यासाठी भरारी पथके तैनात केली आहेत. तपासणी नाक्यावर वाहनांची कडक तपासणी केली जात आहे. दरम्यान, पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर सातारा तालुक्यातील शेंद्रे हद्दीत सोनगाव तर्फ येथे पोलिस विभाग आणि भरारी पथकाच्यावतीने नुकतीच संयुक्त कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत तब्बल ९५ लाखांची रोकड जप्त केली असून ही रोकड एका व्यापाऱ्याची असल्याचे प्रथमदर्शनी समजत असून प्रशासनाकडून सखोल चौकशी करण्यात येत आहे.

याबाबात अधिक माहिती अशी की, मंगळवारी शेंद्रेजवळील सोनगाव तर्फ येथे एमएच ४८ सीटी ५२३९ या चार चाकी वाहनाची पथकाने तपासणी केली. यावेळी ९५ लाख रुपयांची रोकड आढळून आली. पथकाने रक्कम जप्त केली असून ती एका व्यापाऱ्याची आहे. याबाबतचा अधिक चौकशी करण्यात येत आहे.

प्रांताधिकारी सुधाकर भोसले, उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार नागेश गायकवाड, सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांच्या नेतृत्वाखाली प्रशासन अणि पोलिस यांच्या भरारी पथकाने संयुक्तरित्या कारवाई केली.

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments