सातारा : विजय असो,की अन्याविरोधी झगडणे,मिरवणूक निघावी कि मोर्चा,सण साजरा करयाचा असो,की निषेध पोवई नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती साक्षीदार अन प्रेरणास्थान असतेच १९६२ मध्ये कै.बाळासाहेब देसाई यांच्या हस्ते मूर्तीचे अनावरण झाले होते .शिवरायांचा इतिहास गर्भगळीत झालेल्यानसाठी संजीवनी देणारा आहे.संकटान पुढे हतबल झालेल्यांना शिवारायांच्या प्रेरणेने शेकडो हत्तींचे बळ आल्याशिवाय राहत नाही .त्यामुळे शहर असो कि गाव वाड्या पाड्यावर शिवरायांची मूर्ती दिसतेच विशेष म्हणजे शहरच्या मध्यभागी या शिवमूर्तीचे दर्शन होते.स्वातंत्र्या नंतरहि शिवाजी महराजांची प्रेरणा मिळण्यासाठी सर्वत्र शिवस्मारके उभी राहिली .साताऱ्यात शिवप्रेरणा ज्वलंत राहण्यासाठी पोवई आठ रस्त्यावरती शिवाजी महाराजांची मूर्ती उभी करण्याचा काहीनी मानस केला त्यातून शिवस्मारक समितीची स्थापना करण्यात आली .दि.मा.घोडके,हे अध्यक्ष तर वी.श्री .बाबर,भ.बा.माने,य.ज.मोहिते,आ.रा.मोरे,आदी सभासदांनी मूर्ती उभारण्याचा निर्धार पूर्ण केला .मुख्य अधिकारी हि.बा.मोहिते,ईजिनिअर या.रा.बोबडे यांनी
चबुतरयाचे बांधकाम केले .पुणे येथील प्रसिध्द शिल्पकार बी.आर.खेडेकर यांनी हि मूर्ती तयार केली .तत्कालीन शेतकी मंत्री कै.बाळासाहेब देसाई यांच्या हस्ते २६ एप्रिल १९६२ रोजी या मुर्तीचे अनावरण केले .जिल्हा लोकल बोर्डाच्या जागेत या मूर्तीचे उभारणी झाली .त्या वेळी जिल्हा लोकल बोर्डाचे दिनकरराव बोडके अध्यक्ष होते.५६ वर्ष पूर्ण झालेली शिवाजी महाराजांची मूर्ती आजही लाखो जणांना ध्येय गाठण्याची अन्याविरोधात लढण्याची तर विजय मिळालेल्याना रयतेसाठी सत्ता वापरणाऱ्यांनी प्रेरणा देत आहे .तोफेवरती ठेवलेला डावा हात आणि उजव्या हातात धरलेली तलवार दोन हात करण्याचे बळ देत आहे .निरंतर प्रेरणा देत ५६ व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या शिवमूर्तीला संपूर्ण हिदुस्थाचा मानाचा मुजरा