सातारा बस स्थानकात सायंकाळी ५ वाजता अचानक लागलेल्या आगीत पाच शिवशाही बसेस गाळून खाक झाल्या . अग्नीशामक बंबाच्या मदतीने पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला . या आगीचे कारण अद्याप समजू शकले नाही . दरम्यान ,एका मनोरुग्णाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे . सातारा बस्थानकात गेल्या काही दिवसापासून शिवशाही बसेस बंद अवस्थेत उभ्या होत्या . सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास यातील एका बसला आग लागली . या आगीने उग्र रूप धारण केल्याने शेजारील चार बसही आगीच्या संपर्कात आल्या . एका माथेफिरूने हि आग लावल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून ,आगीत पाच बसचे सुमारे १ कोटी २० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे . घटनास्थळावरून दोन संशयिताना ताब्यात घेण्यात आले ते दोघेही मनोरुग्ण असल्याचे सांगण्यात आले . दरम्यान ,पोलिसांना आगीबाबत तपास करण्यासाठी घटना स्थळी धाव घेतली . तीन अग्नीशमन दलाच्या बंबाने हि आग आटोक्यात आणली . पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल आणि सहअधीक्षक श्रीमती अंचल दलाल यांनी घटनास्थळी भेट घेऊन चौकशी केली .