सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई होऊ लागल्याने प्रशासनाकडे पिण्याच्या पाण्याच्या टँकरची मागणी वाढत आहे . सातारा जिल्ह्यात संध्या २ लाख ९४ हजार ४४५ लोकांना १७५ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे . जिल्ह्यातील ११ तालुक्यातील आठ तालुक्यांना टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे . जिल्ह्यात उष्णता वाढत असल्याने पिण्याच्या पाण्याची अवस्था खूप बिकट बनत चालली असून जिल्हात आठ तालुक्यातून १७८ गवे व ६०३ वाड्या वस्त्यावरील दोन लाख ४९ हजार ४४५ लोकांना १७५ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे . जिल्ह्यात टंचाईची झळा सर्वाधिक माण तालुक्यात बसत आहे . एकट्या माण तालुक्यात ८३टँकरने ६५ गावे व ४०१ वाड्या वस्त्यांवर पाणी पुरवठा केला जात आहे . अनेक ,विहिरी बोअरवेल आटल्या असून ,शेतीसाठी पाण्याची उपलबध्दता नसल्याने पिकांचे ही नुकसान झालेले आहे . माण पाठोपाठ खटाव ,तालुक्यात ३४ टँकरने ४४ गवे व १०७ वाडयांनवर पाणीपुरवठा केला जात आहे . कोरेगाव तालुक्यातील २३ टँकरने २६ गावात पाणीपुरवठा केला जात आहे . पाटण तालुक्यातील ४ टँकरने एक गाव व चार वाड्यावर वाई तालुक्यात चार टँकरने तीन गाव तीन वाड्या खंडाळा तालुक्यात एका टँकरने एका गावात कराड तालुक्यात २ गावात एका टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे . तलावासह ,विहिरी आणि बोअरवेलची पाणीपातळी दिवसेंदिवस खालीच जात आहे . परतीचा पाऊस ही झाला नसल्याने भूजल पातळीत वाढ झाली नाही .
सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई
RELATED ARTICLES