नवारस्ता पाटण येथील १२ वर्षीय सारी रुग्ण ,वानरवाडी येथील प्रतिबंधित क्षेत्रातील २५वर्षीय गरोदर महिवाल,मुंबई येथून आलेली पाटण तालुक्यातील सदूवरपेवाडी येथील ३०० वर्षीय महिला ,मुंबईवरून आलेली उंब्रज ता . कराड येथील २९ वर्षीय महिला आणि पाटण तालुक्यातील सदूवरपेवाडी येथील ३४ वर्षीय पुरुष व कराड येथील कृष्णा मेडिकल कॉलेज येथे उपचार घेणाऱ्या कराड तालुक्यातील वानरवाडी येथील २५ वर्षीय युवकाचा अहवाल कोरोना बाधित आला असून २० जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती जिल्हा चिकित्सक डॉक्टर आमोद गडीकर यांनी दिली . तसेच क्रांतिसिह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय ,सातारा येथील ३८ व कृष्णा मेडिकल कॉलेज ,कराड येथील ४१,ग्रामीण रुग्णालय वाई येथील ८१,वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथील ६९,ग्रामीण रुग्णालय कोरेगाव येथील ११ असे एकूण २४० नागरिकांच्या घशातील स्रावाचे नमुने एन . सी . सी . एस पुणे यांच्याकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत .