Saturday, August 9, 2025
HomeMain Newsसातारा जिल्ह्याची कोरोनमुक्तीची संख्या १६ हजार पार

सातारा जिल्ह्याची कोरोनमुक्तीची संख्या १६ हजार पार

सातारा जिल्ह्यात कोरोनाची एवढी गंभीर  परिस्थिती होईल असे वाटत नसल्याने  जिल्ह्यावासीय जूनपर्यंत बेफिकर  होते .  मात्र गेल्या दोन ,तीन महिन्यात जी परिस्थिती  समोर  आली  त्यामुळे वातावरण पॅनिक झाले .  शरीरातील ज्या ऑक्सिजन पातळीचा कधीच उल्लेख  झाला नाही . ती चेक करण्याची वेळ अली आहे .  त्याच ऑक्सिजन बेडची कमतरता असल्याने नागरिकांमध्ये भीती व गोंधळाचे  वातावरण आहे .  काळजी घेतल्यास संसर्ग टाळता येतो व कोरोना बराच होतो  हि भावना नागरिकांमध्ये निर्माण होण्यासाठी  प्रशासनाने तो  विश्वास  व दिलासा देण्याची सध्या प्रचंड गरज आहे . तो मासे कुटूंब माझी जबाबदारी या जिल्ह्यात सुरु करण्यात आलेल्या  मोहिमेतून दिला पाहिजे .

दरम्यान जिल्ह्यात सोमवारी रात्री आलेल्या रिपोर्ट नुसार ८९८ नागरिकांचे अहवाल  कोरोना बाधित आले आहेत . तर ३५ कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान  मुर्त्यू झाले आहेत . तर  सायंकाळी आलेल्या  अहवालात ९३० नागरिकांनी कोरोनावर मात  केली तर  रात्री उशीरा आलेल्या अहवालात ९७३ एवढ्या जणांचा अहवाल बाधित आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ .  सुभाष चव्हाण यांनी दिली आहे .

जिल्ह्यात  विविध रुग्णालयात आणि कोरोना सेंटर मध्ये डिसियचसी  व सीसीसीमध्ये उपचार घेर असलेल्या संध्याकाळीपर्यंत ९३० नागरिकांना घरी सोडण्यात आले .  रिकव्हरी रेट वाढू लागला असून  कोरोना मुक्तीच्या आकड्याने १६ हजाराचा टप्पा पार केला आहे .  आजपर्यंत जिल्ह्यातील १६,५२४  जणांनी कोरोनावर मात  केली असून हि बाब दिलासा देणारी आहे . पश्चिम महाराष्ट्रात कोरोनमुक्तीच्या लढ्यात महत्वाची  भूमिका बजाविणाऱ्या  कृष्णा हॉस्पिटला प्लाझ्मा थेरीपीस मान्यता मिळावी आहे . अशी मान्यता लाभलेले कृष्णा  हॉस्पिटल जिल्ह्यातील  एकमेव  रुग्णालय असून  या थेरपीचा लाभ कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी अधिक लाभदायी ठरणार आहे . जिल्ह्यातील पहिली चाचणी लॅब . कोरोना लस  संशोधनात सहभागी असणारी जिल्ह्यातील एकमेव संस्था अशी कामगिरी करणाऱ्या कृष्णा  हॉस्पिटलला प्लाझ्मा थेरपीस मान्यता  मिळावी  आहे . याबाबतचे अधिकृत पत्र  अन्न  व औषध प्रशासनाकडून प्राप्त झाले आहे .

मंगळवार पर्यंत जिल्ह्यात

एकूण  नमुने ५७,३६९

एकूण  बाधित २६,४४९

एकूण  कोरोनमुक्त १६,५२४

एकूण  मृत्यू ७२५

उपचारार्थ  रुग्ण ९,२००

मंगळवारी

एकूण बाधित ९७३

एकूण  मुक्त ९३०

एकूण  बळी  ३५

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments