सातारच्या नगरपालिकेच्या ४० वर्षांपासून रखडलेल्या हद्दवाढीच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली . मंगळवार दिनांक ८ रोजी महाराष्ट्र राज्यांचे उपमुखमंत्री मा . अजित पवार यांनी या हद्दवाढीलाची अंतिम सूचना सातारचे भाजपचे आमदार मा . शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे सुपूर्त केली . गेल्या ४० वर्षांपासून त्रिशंकू भागातील नागरिकांच्या होणाऱ्या गैरसोयी दूर होतील . याबद्दल त्रिशंकू भागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले व सरकारचे आभार मानले