Sunday, August 10, 2025
HomeUncategorizedसहा मुख्यमंत्री दिलेला सातारा जिल्हा

सहा मुख्यमंत्री दिलेला सातारा जिल्हा

महाराष्ट्राच्या राजकारणातील सातारा जिल्हा हा महत्वाचा जिल्हा आहे . मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची  सूत्रे हाती घेतल्यानंतर महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्याला ६ मुख्यमंत्री देण्याचा मान  मिळाला आहे . त्यामध्ये महाराष्ट्राला ५ आणि उत्तर प्रदेशाला १ मुख्यमंत्री देण्याचा मान  सातारा जिल्ह्याला मिळालेला आहे .

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री  यशवंतराव चव्हाण कराडमधून आले . ते १९५७ मध्ये कराड मतदार संघातून निवडून आले . ते काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आणि मुंबई राज्याचे मुख्यमंत्री बनले . ते मे १९६० रोजी महाराष्ट्राचे पहिले मुख्यामंत्री झाले .

महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्री राहिलेले शरद पवार हे सातारा जिल्ह्यातील नांदवळ  गावचे आहेत . त्यांचे कुटूंब बारामतीला येण्यापूर्वी पवारांचे पूर्वज नांदवळ येथे राहत होते . दुसरे मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले हे हि  साताऱ्यातून आले असेल तरी त्यांची राजकीय कारकीर्द मुंबई मधून सुरु झाली .

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री झालेले पंडित गोविंद बल्लभ पंत यांचे पूर्वज हे सातारयातील  औध गावचे आहेत . या गावात आजही पंतांच्या नावाने शाळा आहे .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments