Friday, April 25, 2025
HomeUncategorizedसराईत गुन्हेगार टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई

सराईत गुन्हेगार टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई

टोळी जमवून जबरी चोरी करून,स्वतःचा आर्थिक फायदा करवून घेणारे गुन्हेगारीला आळा बसावा यासाठी पोलीस अधिक्षक संदीप पाटील व अप्पर पोलीस अधिक्षक विजय पवार यांनी दिलेल्या सूचना प्रमाणे सध्या सातारा जिल्ह्यातून संघटीत गुन्हेगारीवर अंकुश लावण्यासाठी मोक्का अंतर्गत कारवाया सुरु आहेत .

सन २०१७  मध्ये सातारा जिल्यातील व सातारा शहरातील प्रमोद उर्फ खंड्या धाराशिवकर,महेंद्र तपासे ,अमित उर्फ सोन्या देशमुख,आकाश खुडे,शेखर गोरे,आशिष जाधव व अनिल कस्तुरे,चंद्रकांत उर्फ चंदर लक्ष्मन लोखंडे,अमित उर्फ बिऱ्या रमेश कदम यांच्या अशा एकूण ९ टोळ्यांवर तसेच  सन २०१८ मध्ये उंब्रज गावामध्ये खून करणारी रुकल्या दशरथ चव्हाण याच्या टोळीस व सातारा शहरातील प्रमोद उर्फ खंड्या बाळासाहेब धाराशिवकर,दत्ता रामचंद्र जाधव यांच्या टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाही करण्यात आलेली आहे .सातारा जिल्ह्यामध्ये जबरी चोरी,दरोडा,खंडणी सारखे गुन्हे करणारे गुन्हेगाराच्या आणखी काही टोळ्या पोलीस अभिलेखावर आहेत .व त्या सामान्य लोकांना,महिलांना जोर जबरदस्ती करून दहशत करून दागिने ,रोख रक्कमेची जबरी चोरी करणारे सराईत गुन्हेगार यांच्यावर स्थानिक गुन्हे शाखा ,साताराचे पदमाकर घनवट व पुसेगाव पोलीस स्टेशनचे,सहायक पोलीस निरीक्षक ,श्री.एस.एस.गायकवाड हे पण लक्ष ठेऊन होते .

दि.१६/०४/२०१८ रोजी रात्री ९.30 वाजण्याच्या सुमारास रणसिंगवाडी ता.खटाव गावाच्या हद्दीत खडकखिरा नावाच्या शिवारात बुध ते रणसिंगवाडी ला जाणाऱ्या रस्त्यावर यातील फिर्यादी हे सायकल चालवीत पायी घरी जात असताना आरोपी नामे दिपक नामदेव मसुगडे व त्याचे साथीदार यांनी फिर्यादीस रस्त्यावरती अडवून दिपक नामदेव मसगुडे याने फिर्यादीच्या हातातील सायकल  मध्ये हवा मारणेचा पंप घेऊन डोक्यात,पाठीवर मारहाण केली.व दमदाटी करून एकाने फिर्यादीच्या खिशातील दहा हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले व पळून गेले .या गुन्हेगारावर अजून हि गुन्हे दाखल असल्याचे समजले . या गुन्हेगारांवर मोक्का कायद्या अंतर्गत कारवाही करण्यात आली आहे .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments