Friday, August 8, 2025
HomeMain Newsसचिन, आमच्या शेतकरी बापासाठी कधी ट्विट करशील – स्वाभिमानी शेतकरी संघटना

सचिन, आमच्या शेतकरी बापासाठी कधी ट्विट करशील – स्वाभिमानी शेतकरी संघटना

इंटरनॅशनल पॉपस्टार रिहानाने देशात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावर ट्विट केल्यानंतर देशात एक नवा वाद निर्माण झाला. गेल्या कित्येक दिवसांपासून सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनावर रिहानाने ट्विट करताच एक शब्दही न उच्चारणारे सेलिब्रिटी ट्विटरवर व्यक्त होऊ लागले. विशेष म्हणजे अक्षय कुमार आणि सायना नेहवालचे ट्विट सेम टू सेम असल्यामुळे अनेकांच्या तर भुवया उंचावल्या. ट्विट करणाऱ्यांमधील सचिन तेंडुलकर या नावाने सर्वांना आश्चर्यचकित केले. सचिनने ट्विट केले आणि त्याच्यावर सोशल मीडियावरुन टीकेचा भडीमार सुरु झाल्यामुळे त्याच्याविरोधात ठिकठिकाणी आंदोलनदेखील होऊ लागले आहे.

दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सचिन तेंडुलकरच्या मुंबईमधील घराबाहेर निदर्शन करण्यात आले. यावेळी सचिन, आमच्या शेतकरी बापासाठी कधी ट्वीट करशील, असा सवाल विचारण्यात आला. हे आंदोलन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा प्रवक्ते रणजीत बागल यांनी केले. यावेळी त्यांनी हातात फलक घेऊन सचिनकडे अशी विचारणा केली.

भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड मान्य नाही. बघ्याच्या भूमिकेत बाह्यशक्ती राहू शकतात पण हस्तक्षेप करु शकत नाहीत. भारत भारतीयांना माहित आहे. देश म्हणून आपण सर्व एकत्र राहूया, असे ट्विट सचिन तेंडुलकरने केले होते. हे ट्विट करताना सचिन तेंडुलकरने #IndiaTogether #IndiaAgainstPropaganda हे दोन हॅशटॅग वापरले होते.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments