Friday, August 8, 2025
HomeMain Newsसंघर्षाबरोबर रचनात्मक कार्य करण्याची प्रेरणा देणारं मार्गदर्शक नेतृत्व. आदरणीय लक्ष्मण माने --...

संघर्षाबरोबर रचनात्मक कार्य करण्याची प्रेरणा देणारं मार्गदर्शक नेतृत्व. आदरणीय लक्ष्मण माने — प्रविण मोरे, सामाजिक कार्यकर्ता

परिवर्तन वादी चळवळीचे सक्रिय नेते पद्मश्री लक्ष्मण माने यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!    (01 जुन, 2021)

मी सातारा येथील यशवंतराव चव्हाण समाजकार्य महाविद्यालयाचा विद्यार्थी म्हणून जकातवाडी सातारा येथील महाविद्यालयात प्रवेश घेतला. समाजकार्यात शिक्षण घ्यावं आणि दुर्बल घटक आपण सोबत काम करावं ह्या उद्देशाने मी प्रवेश घेतला. भारतीय भटके विमुक्त विकास व संशोधन संस्था संचलित यशवंतराव चव्हाण समाजकार्य महाविद्यालय जकातवाडी सातारा संस्थेचे संस्थापक आदरणीय लक्ष्मण माने आमचे दादा संस्थेचे प्रमुख हे तसे कॉलेज मधे कधी प्रासंगिक विषयावर शिकवले नाही परंतु ते वर्गात न शिकवणारे मात्र समाज मध्ये समाजामध्ये व्यापक अर्थाचं शिक्षण देणारे शिक्षक होते, त्यांची अनेक भाषणं ऐकली आहेत. स्वतः संघर्षशील व्यक्तिमत्व असुन भटके-विमुक्त समुदायातील मुलांना शिकवा फक्त असे न बोलता त्यानी दुर्बल घटकांना शैक्षणिक प्रगती करावी  बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या विचाराप्रमाणे, पहिले शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा.  ही प्रेरणा जणू चालता बोलता असणारे व्यक्तिमत्त्व म्हणून दादा आमच्यासाठी होते. विद्यार्थी म्हणून वर्गात समाजकार्याचे विविध विषय शिकलो परंतु दादांच्या कडून संघर्ष करण्याची प्रेरणा तर मिळायची त्यांचे जीवनच मूलतः संघर्षमय होते, आम्ही अनेक त्यांचे संघर्ष पाहिलेले आहे. परिवर्तनवादी चळवळीत काम करत असताना फक्त प्रबोधन करणारे अनेक विचारवंत पाहिले परंतु संघर्ष करत असताना त्याला रचनात्मक जोड द्यावी हे त्यांनी उभ्या केलेल्यां संस्थातमक कामातून दिसुन येते. प्रगती ही शिक्षणात आहेत तर शाळा काढल्या पाहिजे परंतु नुसत्या शाळा काढून चालणार नाही त्या आश्रम शाळा असाव्यात आणि त्या ठिकाणी राहण्याबरोबर व शिक्षणाबरोबर इतरही मूल्याधिष्ठित शिक्षण द्यावं म्हणजे ते सक्षम होतील. आमच्या आश्रम शाळे मधली मुलं त्यांचा तो आर्केस्ट्रा आणि त्यांच्या गळ्यामध्ये असणारच सूर ऐकला व शंभर टक्के रिझल्ट पाहीला की त्याचा प्रत्यय येतो. दादांनी महाविद्यालयाच्या बाजूला असणाऱ्या शेतीमध्ये केलेले शेतीचे प्रयोग आणि जरी सरकारने अनुदान दिलं नाही तरी त्या शेतांमधुन पिकणाऱ्या धान्यावर आणि त्यांच्या असणाऱ्या ओळखीच्या धनिक  लोकांच्या कडून मुलांचे पोट भरेल एवढी साधने जमा होत असे. मला एक प्रसंग आठवतो, संस्थेचे अध्यक्ष आदरणीय शरद पवार साहेब नेहमी नऊ मे या तारखेला साताऱ्यात मा . शरदचंद्र पवार साहेब हे दर वर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीच्या कार्यक्रमास व  रयत शिक्षण संस्थेच  वार्षीक बैठकीस उपस्थित राहून आदरणिय पवार साहेब कॉलेजमध्ये संस्थेच्या वार्षीक बैठकीसाठी यायचे व  मुलाच्या संस्थेचा तो कार्यक्रम असल्यामुळे त्यांच्यासोबत नाम.अजित दादा व खा.सुप्रिया सुळे आणि बाकी अनेक मान्यवर तसेच कष्टकऱ्यांचे नेते बाबा आढाव, अंधश्रद्धा निर्मूलनचे नरेंद्र दाभोळकर, लेखक अनिल अवचट तसेच अनेक विचारवंत, साहित्यिक व धम्माच्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या अनेक मान्यवरांना त्या ठिकाणी मी पाहिले आहे. संस्थेचे प्रमुख म्हणून एकदा लोक मान्यवर येत असताना मुलं त्यांच्या स्वागताला उभी राहिली त्यापैकी एकाने विचारलं एवढ्या उन्हाची मुलांना कशाला उभा केला आहे त्याच्या पायात चपला नाहीत आणि उन्हातान्हात उभे राहिले दादांनी त्यांना सांगितलं, ते संस्थेची आपण प्रमुख आहात म्हणून तुमच्या स्वागताला ती मुलं उभी आहेत त्याच्या पायाला चप्पल आणि डोक्याला तेल लावायचे असेल तर मोठ्या उद्योगपतींच्या माझ्या ओळखीचे नाहीत ते तुमच्या ओळखीचे आहेत. काही दिवसात चप्पल व तेल संस्थेसाठी उद्योगपतींकडुन मिळाले. मुलांच्या शाळेसाठी लागणारे साहित्य कधी त्यांच्या असणाऱ्या व्यक्तिमत्त्वामुळे, त्यांच्या असणाऱ्या ओळखीमुळे व त्यांच्याकडे असणाऱ्या कलागुणांच्यामुळे ते मिळत असे. एकदा असेच संस्थेच्या आवारामध्ये संस्थेचे विश्वस्त मान्यवर आल्यानंतर काही गाड्या आतमध्ये आले असल्यामुळे थोडी माहिती घेतली तर असं समजलं की सरकार विरोधी पक्षाचा आल्यामुळे त्यांनी दादांच्या शाळेचा अनुदान दिले नाही, तर आश्रमशाळेतील मुलांचा अन्नधान्याचा प्रश्न सोडवायचा कसा ? तर संस्थेचे विश्वस्त आदरणीय शरद पवारांचे पश्‍चिम महाराष्ट्रातील काही मोठ्या शेतकऱ्यांच्या मदतीने दादांनी फलटण कडून काही ज्वारीची पोती आणि काही तेलाचे डबे आलेले होते. निश्चितपणे दादांनी संघर्ष तर केलाच परंतु त्याबरोबर अशा रचनात्मक कामाची जोड त्यांनी नेहमी दिली. दादांची संस्थेच्या नावात संशोधन शब्द आहे.  दादांचे व्यक्तिमत्त्व  मुलतः संशोधनात्मक. छोट्या छोट्या गोष्टीत त्यांचे बारकावे आणि तो संघर्ष आणि त्याच्या संदर्भामध्ये त्यांचे आकलन हे फार शिकवणारा होते. एकदा मी कोणाकडून तरी ऐकलं होत की, जकातवाडीच्या  कॉलेजच्या पाठीमागे एक भटक्या-विमुक्तांची वस्ती आहे. ऐकलं होतं की रोज दारू पिऊन नवरा त्याच्या बायकोला तो मारतो, कॉलेजमध्ये शिकत होतो काऊसिलिंग, केस वर्क, ग्रुप वर्क शिकत होतो मात्र दादांचे प्रॅक्टिकल सोशल वर्क सांगत होतं. दादांनी त्या बाईला सांगितलं त्यानं तुला रोज का मारावं, तू एकदा त्याला मार. बाई एकदम कावरीबावरी झाली मात्र दादांनी सांगितलं ते केलं पाहिजे म्हणुन नवऱ्याने दारू पिल्यानंतर त्या बाईला मारण्याचा प्रयत्न करत असताना त्या बाईने दोन जोरात धपाटे त्या नवर्‍याला मारले, तो माणूस आडवा झाला त्याला काहीच कळेना कि रोज मार खाणारी बायको आज मला मारते. कसं काही माहीत नाही पण त्यांचा झगडा मिटला. दादांचे प्रॅक्टिकल सोल्युशन वेगळे होते. दादा मारझोड करण्याच्या विचाराचे नव्हते, दादांनी नेहमीच बुद्धाचा  करुणेचा विचार जोपासला, बहुजन हिताय बहुजन सुखाय हा विचार जोपासला. महात्मा गांधींचा सुद्धा सत्याग्रह आणि अहिंसा हा विचारच जोपासला.फुले शाहू आंबेडकरांचा समताधिष्ठित समाज निर्माण करण्याचा विचार जोपासला, डाॅ बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असणारा धम्म त्यांनी जोपासला. परंतु त्यांचा प्रॅक्टिकल विचार करण्याची पद्धत फार सुसंगत होती, त्यामुळे आम्ही वर्गांमध्ये सोशल वर शिकलो परंतु दादांच्या वागण्या- बोलण्या मधून दादांच्या कृतिशील कामांमधून जे काही शिकलो ते काही समाजकार्याच्या डिग्री पेक्षा काहीतरी वेगळं होतं याचा प्रत्यय आज आम्हाला काम करताना येतो. आज माझ्यासारखी असंख्य मुलं देशात किंबहुना परदेशात सुद्धा वेगवेगळ्या पातळीवर काम करताना येतो. पण ज्याला समजले त्याला समजलं.  दादा वेगवेगळ्या पद्धतीने संघर्ष करायला शिकवायचेशपरंतु रचनात्मक कामाची त्याला जोड असावी याची ते खऱ्या अर्थानं आग्रह असायचे. फक्त आश्रम शाळेचा विषय नाही त्यांनी अनेक प्रयोग करून पाहिले, सार्वजनिक जीवनामध्ये माणसं उभी करण्याचा त्यांनी केलेला प्रयत्न खरच वाखाणण्यासारखा आहे, त्यांनी जोडलेली माणसं आजही त्या संस्थेशी संबंधित आहेत म्हणून दादांनी त्यांच्या जीवनातून संघर्ष करण्याची प्रेरणा दिली. मात्र रचनात्मक विचार करण्याची पद्धती आणि त्यांनी केलेल्या प्रयोगातून मनामध्ये आमच्यासारख्या असंख्य मुलांच्या बसलेली ती विचारसरणी प्रेरणा देत राहीली. म्हणूनच जेव्हा जेव्हा मी दादांच्या व्यक्तिमत्त्वाकडे पाहतो तेव्हा तेव्हा मला हेच वाटतं की अतिशय योग्य व्यक्तिमत्त्व आहे, राजकीय दृष्टिकोनातून काय होऊ शकले नाही किंबहुना दुर्बल घटकातील काही राजकीय धुरीणांनी सुद्धा त्यांना नाकारलं, परंतु समाज हिताचे काम करणारा सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांचे स्थान माझ्यासारख्या असंख्य लोकांना नेहमीच उच्च स्थानी वाटलं. त्यांनी सातत्याने सामाजिक कामाला प्राधान्य दिलं माझ्या व्यक्तिगत उदाहरणातुन मी शिकलो आहे आम्ही कधी मुंबईवरून किंवा कुठूनही गावाला गेल्यानंतर आठवणींने जसं पाहुणेरावळे यांच्याकडे जातो तसं जकातवाडीला कॉलेजवर जाणं आमचा नियमच आहे. एखदा दादा राहत असलेलं करंजे हे रस्त्यावर गाव असल्यामुळे मी दादांना न सांगताच त्यांच्या घरी पोहोचलो. दादा आहेत का विचारलं मला समजला आहेत म्हणून मी आत गेलो. आपण एक सामाजिक कार्यकर्ता असल्यामुळे दादांचं घरामध्ये आपलं घर समजून हॉल मध्ये जाऊन बसलो. दादा बाहेर आले व माझ्याशी बोलू लागले. त्याठिकाणी दादांचे चिरंजीव आमचे मोठे बंधू प्राध्यापक भाई शैलेंद्र माने ते त्या ठिकाणी आले आणि दादांना बोलले की तुम्हाला काही भेटायला अगोदरच लोक आलेले आहेत. मी सुद्धा गोंधळून गेलो आणि मी दादांना बोललो दादा तुम्ही त्यांना भेटून या मी तुम्ही आहेत म्हणून डायरेक्ट येऊन बसलो आणि आपली चर्चा सुरू झाली त्यावर दादांनी मला सांगितलं तू बस, तू बस ते मला भेटायला आले आहेत,त्या लोकांच त्यांच्या वैयक्तिक कामासाठी आलेले आहेत व तु या ठिकाणी सामाजिक कामासाठी आलेला आहेस त्यामुळे प्राधान्याने आपण पहिले सामाजिक बोलू आणि नंतर त्यांचे वैयक्तिक काम करू.  हा आदर्श आजही माझ्या डोळ्यासमोर ठेवला आहे. त्यामुळे मी सध्या माननीय मंत्री महोदय रामदास आठवले साहेबांचा खाजगी सचिव म्हणून काम करत असताना मी प्रयत्न करण्याचा प्रयत्न करतो की सामाजिक काम घेऊन येणार्‍या दुर्बल घटकातल्या माणसाला पहिलं प्राधान्य द्यायचं, त्यांचा ऐकून घ्यायचं त्यांचं काम करायचं व गरीब माणसाला पहिली संधी द्यायची. दादांच्या भाषेत शेवटच्या माणसासाठी आपण काम केले पाहिजे. हे मी जोपासले. माननीय मंत्री महोदय साहेबांच्या कडे काम करत असताना समाजातील शेवटच्या माणसाचं, दुर्बल घटकाचे काम करण्याची मोठी संधी निर्माण झाली आणि माझ्यासमोर माझ्या बीएसडब्ल्यू च्या साताऱ्यातील शिक्षणानं त्याच्यानंतर निर्मला निकेतन सारख्या महाविद्यालयातून मुंबईमधून शिकताना जे काही बाळकडू मिळालं की शेवटच्या माणसाचे काम करणं हे आपले तत्व आहे. मुंबईमध्ये निर्मला निकेतन महाविद्यालयाच्या भिंतीवरच लिहिलं होतं. गरिबातल्या गरीब माणसाचं काम करायचं आणि या प्रेरणेतून लोकांची काम करत गेलो आणि म्हणून मला दादा माझे आदर्श आणि प्रेरणास्थान वाटतात. खूप लिहिता येईल मलाही रचनात्मक काम करायचं खूप आहे, आज आदरणीय दादांचा वाढदिवस व वाढदिवसानिमित्त दादांना सविनय जय भीम करतो.  त्यांचे आशीर्वाद घेतो आणि त्यांना निरोगी आणि अजून संघर्षाचा आणि रचनात्मक कार्य करण्याचं काम ते करत राहावेत अशी आशा बाळगतो आणि इथेच थांबतो. पुन्हा पद्मश्री लक्ष्मण माने दादांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments