Sunday, August 10, 2025
HomeMain Newsशेतकऱ्यांच्या आंदोलनावर तीन दिवसांत तोडगा काढा; बच्चू कडू

शेतकऱ्यांच्या आंदोलनावर तीन दिवसांत तोडगा काढा; बच्चू कडू

हजारो शेतकरी केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाविरोधात आक्रमक झाले असून दिल्लीच्या वेशीवर पंजाब, हरयाणातील हजारो शेतकरी पोहोचले आहेत. त्यांना सुरक्षा दलांनी रोखून धरले आहे. अनेकदा शेतकरी आणि पोलिसांमध्ये चकमक घडली आहे. पोलिसांकडून शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी अश्रूधुराचा, पाण्याच्या फवाऱ्यांचा वापर केला जात आहे. विरोधकांनी यावरून मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. त्यातच आता मोदी सरकारला राज्यमंत्री बच्चू कडूंनी थेट इशारा दिला आहे.

सर्व शेतकऱ्यांना केंद्र सरकारने सन्मानाने दिल्लीत येऊ द्यावे व त्यांच्याशी प्रामाणिकपणे संवाद करावा. यावर ३ दिवसात तोडगा निघाला नाहीतर, मी स्वतः महाराष्ट्रातील हजारो शेतकऱ्यांसोबत या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दुचाकी घेऊन दिल्लीत डेरा आंदोलन करेन, असा इशारा कडूंनी दिला आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments