सातारा शहरातील शीवतीर्थ येथील पोवई नाक्याच्या चौकाला लोकनेते स्व . बाळासाहेब देसाई यांचे नाव देण्याच्या घाट घातला जात आहे . यादरमान्य राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नुकतीच भेट घेतली . व शंभूराज देसाई यांच्याबाबत तक्रार केली आहे . यावर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे . माझे आजोबा बाळासाहेब देसाई यांनीच त्या ठिकाणी छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारून शिवतीर्थ हे नाव दिले आहे ,त्यामुळे या परिसराचे शुशोभीकरण करून आयलंड उभारणार आहे . त्यामुळे त्याला कुणी विरोध करण्याचे काम नाही ,असे देसाई यांनी म्हंटले आहे . साताऱ्यात नुकताच देसाई यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला यावेळी ते म्हणाले कि ,शिवतीर्थाचे नाव बदलून दुसरे कोणते नाव देणे हे माझ्या मनातही नाही . माध्यमांनी याचा विपर्यास केला आहे . जसा राजघराण्याला छत्रपती शिवरायांबद्दल आदर आहे . तसाच आदर आम्हाला हि आहे . परंतु दुसऱ्यांच्या मोकळ्या जागेत बाळासाहेब देसाई यांच्या नावाने आम्ही आयलंड तयार करून त्याचे सुशोभीकरण करून नवीन काम करत असू तर त्याला कोणी विरोध करू नये .



