जळगावच्या अमळनेरमधली साने गुरुजींची शाळा इंग्रजी साहित्यामध्ये एम. ए. केलेले साने गुरुजी याच प्रताप हायस्कूलमध्ये शिक्षक होते. 1924 ते 1930 ते अशी सहा वर्ष याच शाळेत साने गुरुजींनी विद्यार्थ्यांना घडवलं.17 जुलै 1908 रोजी सुरु झालेल्या या शाळेला शंभर वर्षांहून अधिकचा इतिहास आहे. मात्र याच शाळेत घोटाळ्याचा धडा गिरवण्यात आल्याचा आरोप केला जातोय. गैरपद्धतीने शिक्षक भरती करुन कोट्यवधींचा मलिदा लाटण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय. या बोगस भरतीची सुरुवात झाली ती 2017 पासून.
बोगस शिक्षक भरतीच्या तक्रारीनंतर ती रद्द करण्यात आली खरी. मात्र कोरोनाच्या काळात मोका साधत पुन्हा बोगस भरती करण्यात आल्याचा आरोप माजी संचालकांनी केलाय. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याच्या नावावर घोटाळेबाजांनी आपले खिसे भरून घेतल्याचा आरोप आहे.. शिक्षकांचे पगार सुरु करु नये अशी मागणी करुनही शिक्षण संचालकांनी आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आहे. साने गुरुजींच्या शाळेतला हा घोटाळा पाहून माजी संचालकांनी उद्विग्न होत आत्मदहनाची भाषा बोलून दाखवली.
दिलीप जैन आणि लोटन चौधरी या दोन माजी संचालकांनी साने गुरुजींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत या घोटाळ्याविरोधात 2017 पासून कायदेशीर लढाईला सुरुवात केली. शिक्षण आयुक्तांसमोर तसंच कोर्टासमोर हा घोटाळा उघड केला. या दोघांच्याही आंदोलनाला आणि लढ्याला यश आलं. आणि सात वर्षानंतर आयुक्तांनी शाळेतली सर्व पदं बेकायदेशीर असल्याचे आदेश दिले.
खरंतर अमळनेर ही साने गुरुजींची कर्मभूमी. संपूर्ण महाराष्ट्रालाच नव्हे तर देशालाही शिक्षक कसा असावा याचा आदर्श साने गुरुजींनी याच अमळनेरमधून घालून दिला.. मात्र याच शाळेत घोटाळ्याचा धडा गिरवण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय.
फक्त साने गुरुजींच्या प्रताप हायस्कूलमध्येच नाही तर तालुक्यात शेकडो शाळांमध्ये अशाच पद्धतीने घोटाळे करुन सरकारी तिजोरीवर दरोडा घातला जात असल्याचा आरोप होतोय.. मात्र झी २४ तास या सर्व घोटाळ्यांचा पर्दाफाश करणार आहे..