राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजकारणातुन निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे.
यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भयंकर नाराजी व्यक्त केली आहे.अनेक राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी यावर निषेध व्यक्त करत आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत.
अनेक कार्यकर्ते यशवंतराव चव्हाण सभागृहात याविरुद्ध घोषणा बाजी करताना देखील दिसुन आले आहेत.
शरद पवार यांनी आपला हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी सर्व कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.
आजच्या लेखात आपण शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातुन निवृत्त होण्याची घोषणा का केली आहे हे थोडक्यात जाणुन घेणार आहोत.
२ मे २०२३ रोजी लोक माझा सांगाती ह्या आत्मचरित्राच्या सुधारीत आवृत्तीच्या प्रकाशनाच्या वेळी राजकारणातुन निवृत्त होत असल्याची ही महत्वाची घोषणा केली आहे.
निवृत्तीची घोषणा करताना शरद पवार असे म्हटले आहे की महाराष्ट्र जनतेच्या सहकार्यामुळे दिर्घकाळ मी राजकारणात कार्यरत होतो.
पण यापुढे आता मी कुठलीही निवडणूक लढवणार नाही असे स्पष्टपणे शरद पवार यांनी सांगितले आहे.
राज्यसभेला आता तीनच वर्षे बाकी आहे.पण आता कुठलीही नवीन जबाबदारी मी घेणार नाही असे शरद पवार यांनी म्हटले आहे.
आता कुठेतरी थांबायला हवे जास्त मोह चांगला नाही असे म्हणत त्यांनी राजकारणातुन निवृत्ती घेत असल्याचे सांगितले आहे अणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष पदावरून देखील निवृत्त होत असल्याची घोषणा त्यांनी केली आहे.
त्यामुळे शरद पवार निवृत्त झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नवीन अध्यक्ष कोण असणार याबाबतच्या चर्चेला सुरुवात देखील झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नवीन अध्यक्ष पदासाठी जयंत पाटील,सुप्रिया सुळे,अजित पवार, प्रफुल्ल पटेल इत्यादी नावे चर्चेत पुढे येताना दिसुन येत आहेत.
शरद पवार यांनी स्व इच्छेने निवृती स्वीकारली असली तरी
शरद पवार यांच्या अचानक निवृती घेण्याच्या ह्या निर्णयाचे मुख्य कारण काय असेल यावर देखील आता राजकीय वर्तुळात चर्चेला सुरुवात झाली आहे.