गेल्या चार दिवसांपासून महाराष्ट्रात ऐंशी वर्षाच्या तरुणाची चर्चा सुरू आहे.ते तरुण म्हणजे शरद पवार.सोलापूरपासून सुरू झालेला त्यांचा वादळी दौरा जाईल तिथं तरुणाईला साद घालतोय. तरुण पिढी साहेबांच्या प्रेमात पडलीय.असच एक उदाहरण आज घडलं…
आज पहाटे सातारा येथून पाच सायकलस्वार तरुण पवार यांना भेटायला बारामतीला आले.ते पहाटे लवकर निघाले आणि साडेसात वाजता बारामतीत पोहोचले.विशेष म्हणजे हे तरुण राजकीय पक्षाशी संबधीत नाहीत मात्र “पवारसाहेबांना तुम्ही एकटे नाहीत आम्ही तुमच्यासोबत आहोत हे सांगायला आलो आहे.”अशी प्रतिक्रिया त्या तरुणांनी दिलीय…
राष्ट्रवादी काँग्रेसमधून अनेक शिलेदार बाहेर पडल्यावर पक्षात नैराश्य आले होते.हे नैराश्य कमी करण्यासाठी शरद पवार यांनी सोलापूरपासून सभांना सुरुवात केली.त्यांचे सोलापुरातील भाषण तरुण कार्यकर्त्यांना उर्जा देणारे ठरले.या सभेनंतर पवार जिथं जातील तिथं तरुणांची गर्दी व्हायला लागली.त्यांच्याभोवती तरुण गराडा घालू लागले.हेच चित्र कायम दिसलं…
आज पहाटे चार वाजता गणेश ननावरे,विपुल मोरे,सौरभ माने, रोहित गाढवे,केदार जंगम हे पाच तरुण सातारा येथून सायकलीने निघाले.ते साडेसात वाजता बारामतीला पोहोचले.त्यानी पवार यांची भेट घेऊन,”साहेब आम्ही तुमच्यासोबत आहोत”असे सांगितले. हे तरुण राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी नाहीत. मात्र “आता या परिस्थितीत साहेबांना साथ देणं,त्यांच्या सोबत राहणं आम्हाला महत्वाचं वाटत म्हणून आलो.”अस त्यानी सांगितले…