Sunday, August 10, 2025
HomeUncategorizedशरद पवारांच्या मागे धनगर समाजाची ताकत उभी राहिली तर भाजप अडचणीत येऊ...

शरद पवारांच्या मागे धनगर समाजाची ताकत उभी राहिली तर भाजप अडचणीत येऊ शकतो .

धनगर समाज मतं दुसऱ्याला देतो आणि आरक्षणाचा प्रश्न मात्र मी सोडवायचा ,हे वागणं बरं न्हवे ,शरद  पवारांनी २०१९ च्या निवडणुकीच्या तोंडावर केलेले स्टेटमेंट  धनगर समाज शरद पवारांपासून २०१४ पासून दुरावला ,आणि पवारांच्या बालेकिल्यांना धक्के बसले . ज्या पश्चिम महाराष्ट्रात राजकारण करू पाहतात . त्या भागात धनगर समाज निवडणुकीत निर्णयाक  मते टाकत असतो . ज्या प्रकारे मराठा ,ओबीसी ,असं राजकारण सुरु असते . तेव्हा धनगर हा फॅक्टरकडे दुर्लक्ष करून  आपल्याला चालत नाही .त्यात राष्ट्रवादीत दोन गट  पडलेले असताना धनगर समाज कुणाच्या पाठीशी उभा राहतो . यावरही अनेकांची राजकीय भव्यतवे  अवलंबून असणार आहेत . भाजपने अनेकदा खेळी करून शरद पवारांच्या पाठीशी असणारी हि धनगर व्होटबँक फोडण्यासाठी  प्रयत्न केले . पण पवारांनी अनेक खेळ्या करत धनगरांची शक्ती आपल्या पाठीशी कायम ठेवली आहे . लोकसभेच्या रीगणात शरद पवारांना एकीकडून अजित पवार  तर दुसरीकडून भाजपने घेरले आहे . या सगळ्यात धनगर समाजच आपल्या बालेकिल्ल्याला  स्वरक्षण देऊ शकतो . हे ओळखून पवारांनीच धनगर कार्ड खेळायला सुरवात केली . राष्ट्रवादीच्या कोणत्या हि बालेकिल्ल्यात पवारांना धनगर समाजाशिवाय पर्याय दिसत नाही . २०२४ च्या या अटीतटीच्या लढतीत धनगर समाज कुणाला बळ  देताना दिसू शकतो . हे पाह्यला मिळणार आहेच

अहिल्यादेवी होळकर राजघराण्याचे तेरावे वंशज भूषणसिंह होळकर यांच्या हातात तुतारी देत शरद पवारांनी अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे . त्यांना राष्ट्रवादीशरद पवार गटाचे लोकसभा निवडणुकीसाठीचे स्टार प्रचारक असतील . होळकरांना सोबत घेत पवारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले आहेत . त्यातलं सर्वात महत्वाचे म्हणजे शरद पवार पश्चिम महाराष्ट्रातल्या ज्या पट्ट्यात राजकारण करतात . तिथे धनगर समाज हा महत्वाचा फॅक्टर असल्याचं अनेक निवडणूकातून दिसून आले आहे . हेच ओळखून पवारांनी अनेक धनगर नेत्यांना कार्यकर्त्यांचे बळ दिले आहे . बारामतीसारख्या ठिकाणीही धनगर समाजाचे एकगठ्ठा मतदान पाहून पवारांनी तालुक्यातील स्थानिक धनगर नेत्यांना बाळ दिले . मात्र कार्यकर्त्यांचे नेटवर्क अनेक वर्षांपासून अजितदादाच सांभाळत असल्याने . राष्ट्रवादीच्या फुटीनतंर या धनगर समजायच्या नेत्याची फळी अजितदादांसोबत गेली . अशावेळेस  धनगर समाजातील चेहरा पवारांना काही केल्या मिळत न्हवता . याचाच एक भाग म्हणून भाजपवर नाराज असलेल्या आणि स्वतंत्र राजकारण करू पाहणाऱ्या जाणकारांना माढ्यातून पाठींबा देण्याची खेळी पवारांनी केली . खरतर माढा ,बारामती ,सातारा ,अहमदनगर या मतदार संघात धनगर समाज हा निवडणुकीत गेमचेंजर ठरतो . म्हणूनच पवारांनी जाणकारांसोबतची जवळीक वाढवत भाजपचं टेन्सन  वाढवलं . जानकर  शरद पवारांसोबत येणे म्हणजे धनगर समाजाचं पाठबळ आपल्या पाठीशी आहे . असा संदेश पवारांना पुढे घेऊन जात आले असते . मात्र भाजपनं संभाव्य धोका ओळखून ज्या जाणकारांना साईडला केले होते . त्यांच्याशी पुन्हा मिळत जुळते घेऊन त्यांना एक जागा पण सोडावी लागली . शरद पवारांचा मोठा डाव फसल्यानंतर  आत्ता  मात्र त्यांनी घाव हा थेट मुळावर घातलाय . स्वघोषित धनगर नेत्यांची हाजी हाजी करण्यापेक्षा पवारांनी थेट होळकर घराण्यातील तेरावे वंशज भूषणसिह होळकर यांना सोबत घेत मोठे बेरजेचे राजकारण घडऊन आणले आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments