Friday, August 8, 2025
HomeMain Newsविश्वास नांगरे पाटील यांची नाशिकला बदली

विश्वास नांगरे पाटील यांची नाशिकला बदली

कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांची नाशिक पोलिस  आयुक्तपदी नियुक्ती झाली .त्यांच्या जागी प्रकाश मुत्याल यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे .नाशिकचे सध्याचे पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल यांची नियुक्ती कोठे झाली आहे ,हे अद्याप कळू शकलेले नाही .

महाराष्ट्रातील तरुणांच्या  गळ्यातील ताईत असलेले आणि पोलिस सेवेचे धडाडीचे आयपीएस अधिकारी म्हणून परिचित असलेले नांगरे पाटील हे मुळचे सांगली जिल्ह्यातील आहेत .शिराळा तालुक्यातील कोकरूड हे त्यांचे गाव .विश्वास नांगरे पाटील यांचा आयपीएस बनण्यापर्यंतचा प्रवास खडतर होता .म्हणून आजही त्यांच्याकडे अनेक तरुण प्रेरणादायी  व्यक्तिमत्व म्हणून पाहतात .स्पर्धा परीक्षा करून पोलीस सेवेत येऊ पाहणाऱ्यांचे नांगरे पाटील हे रोल मॉडेल आहेत.त्यांनी आतापर्यंत लातूर जिल्हा पोलिश अधीक्षक ,अहमदनगर  जिल्हा पोलिश अधीक्षक,पुणे ग्रामीण पोलिश अधीक्षक,मुंबई पोलिस  उपआयुक्त ,ठाणे ग्रामीण पोलिश अधीक्षक ,अप्पर पोलिस आयुक्त ,मुंबई पश्चिम विभाग,पोलिस  महानिरीक्षक कोल्हापूर  परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक म्हणून काम केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments