अहमद इब्न माजिद या माणसाचे नाव माहित असण्याचे कारण नाही. अरबी माणूस ,१४३२ सालचा व्यापारी पण याच माणसांनी भारताचा नकाशा बदलण्याचे आणि युगाची कुसपालाट करण्याचे काम केले होते . कारण वास्को द गामाला भारतात आणून इथे परकीय सत्तेचा पाया रोवण्यात या माणसाचा वाटा मोठा होता .त्याचेच नाव आहे अहमद इब्न माजिद माजित यांच्या घरीच जहाज बनवण्याचा धंदा होता . वयाच्या १७ वर्षा पासून त्याने सुमुद्री सफर करण्यास सुरवात केली होती . त्यांचे वडील नावाजलेले खलाशी होते . या माणसाने आपले अर्धे आयुष्य समुद्रावर घालवले असे म्हणावे लागेल इतका त्याचा महासागरात वावर होता .
त्याने नक्की कधीपासून हा उद्योग केला याची तारीख माहित नाही . पण त्या काळी तीन खंडामध्ये त्याच्या नावाचा दरारा होता . सागरात प्रवास करणारा धाडशी वीर म्हुणून तो प्रसिद्द होता . कोलंबस व बाकीचे लोक यात उतरण्यापूर्वी कित्येक भारतीय आणि आफ्रिकन यात यश मिळवले होते . १५०० सालच्या आसपास त्यांचा मृत्यू झाला . पश्चिमेकडे अनेक वर्ष त्याची ख्याती गामाला भारताचा मार्ग दाखवणारा माणूस म्हूणन प्रसिद्ध होती . हा माणूस मनाने कवी होता . त्याने लिहिलेली जवळजवळ ४० पुस्तके आज हि अरेबिक भाषेत प्रसिद्द आहेत . त्याला ओमान व इतर भागामध्ये समुदारवरचा सिहं ओळखले जात असे . इब्न माजिद याने समुद्राच्या माहिती विषयी सागरी सफारीच्या विज्ञानावर अनेक पुस्तके लिहली . पूर्व आफ्रिका ,भारत आणि जगातील इतर काही स्थानावर पोचण्यासाठी त्याने अनेक लोत्याने जहाजाच्या हालचाली कशा कराव्यात समुदारात विविध प्रसंगात जहाज कसे तारून न्याहावे त्याची संपूर्ण माहिती आपल्या लेखनात दिली आहे . ‘किताब आलं फवाईद उसूल ईल्म आल बहर वा कवाईद ‘ आपल्या पुस्तकातून तो बराच प्रशिध्द झाला या पुस्तकात खलाशीकामाची तत्त्वे ,मुलुभूत बाबी आणि फायदे याचे संपूर्ण वर्णन त्याने केले आहे . हा खलाशी काम व त्या संबधीत माहितीचा ज्ञानकोशच आहे असे म्हणता येईल . यात त्याने समुद्र पर्यटनाची मूळ तत्त्वे ,त्याचे विज्ञान ,चंद्राचा समुदारवर होणार परिणाम ,लाटांची गती ,मुक्त समुद्रातील चलन ,अशा अनेक गोष्टी त्याने यात मांडलेल्या आहेत .
पूर्व आफ्रिका ,इंडोनेशिया ,भारतातील पाऊस ,मौसमी वारे ,वादळे आणि इतर अनेक गोष्टींवर आपल्या लेखनातून प्रकाश टाकला आहे . हिंदी महासागराच्या कानाकोपऱ्यात कशे फिरावे हे त्याच्या पुस्तकात आहे . त्याला समुदगमनाचे गुरु म्हुणुन संबोधले जाते . वास्को द गामा आफ्रिकेच्या पुढे कसा आला या संबधी अनेक गोष्टी इतिहासकारांनी लिहून ठेवल्या आहेत . ऑटोमन तुर्कांनी याने १४१४ साली कॉन्स्टोनिटॉपोल हे शहर जिकंले याच शहराचे नाव नंतर बदलून इस्तूबुल करण्यात आले . युरोपातून भारताकडे येणार मार्ग इस्तूबुल मधून येत असे . मात्र हा मार्ग बंद झाल्यानंतर समुद्रमार्गे भारतात येण्याचा प्रयत्न करण्याची गरज होती . त्यासाठी अनेक जण तयार होते . पण हा मार्ग कुणाला सापडत नव्हता . सरतेशेवटी आपल्या अंदाजाने अनेक खलाशी भारताच्या निघाले मात्र ते दूरवर भटकत राहिले वास्को द गामा हा सुद्धा पोप आणि राज्यांच्या दूरच्या सफरीवरती निघाला होता . मालिंदीच्या त्याची ओळख इब्न मजीद यांच्याशी करून दिली . कांना मदत केली . पर्शियामध्ये समुद्रमार्गे उतरणारा तो पट्टीबाज खलाशी होता. त्या काळी सर्व देशांमध्ये नवनवे मार्ग शोधण्यासाठी जीवघेणी स्पर्धा लागलेली होती . त्यामुळे कोणीही खलाशी आपल्याला माहित असलेले ज्ञान बाहेर सांगत नसे . अशा काळात आपल्या अनुभवावर जगातील सर्व लोकांचा अधिकार आहे . अशा उदार मनाने मजीत यांनी आपल्या लेखनातून आपले अनुभव सगळ्यांसाठी खुले केले .
काही इतिहासकारणाच्या मते एका दारूच्या नसेत असणाऱ्या गुजराती माणसांनी वास्को द गामाला भारताचा मार्ग सांगितला होता . आणि हा व्यापारी भारतात आल्यानंतर पोर्तुगालला परत हि गेला होता. या संबधी कोणतेही पुरावे दिसत नाहीत . शिवाय हा प्रवास तब्बल २३ दिवसाचा होता . त्यामुळे असे काय घडले असण्याची शक्यता फार अल्प आहे . त्याने लिहलेल्या एका पुस्तकाचा वापर करून पोर्तुगीज पुढे जगभर फिरले . त्याचे नाव मात्र जनतेच्या स्मरणातून कायमचे गेले . युरोपिन आणि इतर लोकांना नौकायानाची अतिशय त्रोटक माहिती असतानाच्या काळात हा माणूस जीवावर उधार होऊन जग फिरला होता . ‘किताब आलं फवाईद उसूल ईल्म आल बहर कावाईद हे जवळपास प्रत्येक खलाशांकडे मिळणारे पुस्तक होते . त्या पुस्तकांशिवाय प्रवास करू नये असे म्हटले जात असे . या पुस्तकात अगदी तक्तयाच्या स्वरूपात सुद्धा माहिती दिली आहे . त्याने स्वतः लिहलेली काही पुस्तके त्यांच्याच हस्तक्षरात फ्रान्सच्या संग्रालयात आहेत .