सातारा येथील वाढे फाटा येथे गाईची तस्करी होत असल्याच्या धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे . वाढे येथील ग्रामस्थानी पोलिसांच्या निदर्शनास आणून दिला असून आज रोजी दुपारच्या सुमारास गीर जातीच्या ८ ते दहा गाई एका गोडाऊन मध्ये एका व्यक्तीने बंद करून ठेवल्याचे स्थानिक नागरिकांना मिळाली.या बाबत नागरिकांनी त्यांच्या कडे चौकशी केल्यावर संबंधित व्यक्तीने सातारा शहरातील येथील सदरबझार येथे कत्तल खाण्यात कत्तल करण्यासाठी घेऊन जात असल्याची माहिती दिली. हा प्रकार बऱ्याच दिवसापासून या ठिकाणी होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करीत आहेत.याचीमाहिती पोलिसांना समजताच शाहूपुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वाईकर यांनी घटना स्थळी जाऊन याचा तपास सुरु केला .