२२ मे १९३४ वाठार स्टेशन .
सातारा जिल्ह्यात वाठार स्टेशन हे महत्वाचे स्टेशन मानले जायचे.
ब्रिटीश राजवटीत इंग्रज अधिकारी मुंबई-मिरज रेल्वे मार्गाने पाचगणी महाबळेश्वर येथे जात.
त्याच बरोबर त्यावेळी इंग्रज राजवटीचे तंबू उत्तर सातारा मध्ये
चार ठिकाणी लावून कारभार पहिला जात होता.
त्या काळात जवळपास कोठेही हॉटेल व खानावळ नव्हती.
त्यावेळी २२ मे १९३४ रोजी बेनझी या रेल्वे ठेकेदाराने वाठार रेल्वे स्टेशन या ठिकाणी
खानावळ चालू करण्यासाठी सोनुबाई व द्दुर्गाबाई यांना संमती दिली.
८० वर्षाच्या अखंड सेवेला सातारकरांचा सलाम !



