आर . बी. आयने मंगळवारी महाराष्ट्र व कर्नाटक मधील दोन सहकारी बँकांचे परवाने रद्द केले . यात कर्नाटकमधील तुमकूर येथील श्री शारदा महिला सहकारी बँक आणि महाराष्ट्रतील सातारा जिल्ह्यातील वाई तालुका येथील हरिहरेश्वर सहकारी बँकेचा समावेश आहे . या बँकांकडे पुरेसे भांडवल आणि कमाईची साधने नसल्याने त्याचा परवाना रद्द केल्याचे आर .बी .आय ने म्हटले आहे . वाई येथील हरिहरेश्वर सहकारी बँकेने ११ जुलै २०२३ पासून बँकिंग व्यवसाय करणे बंद केले आहे ,असे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने निवेदनात नमूद केले आहे . हरिहरेश्वर सहकारी बँकेचे सुमारे ९९. ९६ टक्के ठेवीदार त्यांच्या ठेवीची संपूर्ण रक्कम ठेव विमा आणि क्रेडिट ग्यारंटी कॉर्पोरेशन कडून मिळण्यास पात्र आहेत . तर शारदा महिला सहकारी बँकेच्या बाबतीत सुमारे ९७. ८२ टक्के ठेवीदार त्यांच्या ठेवीची संपूर्ण रक्कम DICGS कडून मिळण्यास पात्र आहेत . लिकवेडेशन नंतर प्रत्येक ठेवीदार त्यांच्या ठेवीची ५ लाखांपर्यंतची ठेव विमा दाव्याची रक्कम DICGS कडून मिळण्यास पात्र असतील . या बँकांचे परवाने रद्द केल्यामुळे या बँकांना बँकिंगचा व्यवसाय करण्यास मनाई करण्यात आली आहे . ज्यात ठेवी स्वीकारणे आणि ठेवीची परतडफेड करणे यासह इतर गोष्टींचा समावेश आहे . तसेच सध्याची आर्थिक स्थिती पाहता या बँका त्यांच्या सध्याच्या ठेवीदारांना संपूर्ण पैसे देऊ शकणार नाहीत . असेही आर .बी . आय नमूद केले आहे . ८ मार्च २०२३ पर्यंत DICGC ने श्री . शारदा महिला सहकारी बँकेच्या ठेवीदारांना एकूण विमा उतरवलेल्या ठेविनापैकी १५ . ०६ कोटी रुपये आधीच दिले आहेत .
सहकार आयुक्त आणि सहकारी संस्थांचे निबंधक महाराष्ट्र यांनादेखील सदर बँक बंद करण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे .