Friday, August 8, 2025
HomeMain News‘वर्ल्ड बूक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद होणारा पहिला भारतीय अधिकारी, कृष्ण प्रकाश यांना...

‘वर्ल्ड बूक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद होणारा पहिला भारतीय अधिकारी, कृष्ण प्रकाश यांना ‘आयर्न मॅन किताब’

पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांना आयर्न मॅन हा किताब मिळाला आहे. त्यांची नोंद वर्ल्ड बूक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे. अशी नोंद होणारे ते पहिले भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत. हा मान भारतीय सैन्य किंवा निमलष्करी दलातील अधिकाऱ्यांना देखील अद्याप मिळालेला नाही. हा विक्रम आपल्या नावावर होण्यासाठी पोलीस अधिकारी कृष्ण प्रकाश यांनी प्रचंड मेहनत घेतलीय. त्यामुळे त्यांचं देशभरातून कौतुक होत आहे. त्यांनी आज (20 जानेवारी) सोशल मीडियावर याची माहिती दिली

कृष्ण प्रकाश यांनी आपल्या पोस्टमध्ये हा सन्मान देशाला, भारतीय पोलीस दलातील सहकाऱ्यांना, कुटुंबाला आणि त्यांना पाठिंबा देण्या सर्वांना अर्पण केलाय. त्यांनी 2017 मध्ये आयर्नमॅन ट्रायथलॉन हा जगातील सर्वात आव्हानात्मक एक दिवसीय खेळ प्रकार पूर्ण केला होता. ही स्पर्धा पूर्ण करण्यासाठी स्पर्धकाला 3.8 किलोमीटर पोहणे, 180.2 किलोमीटरची सायकलिंग आणि 42.2 किलोमीटर धावावं लागतं. हे सर्व केवळ 16 ते 17 तासांच्या कालावधीत पूर्ण करायचं असतं.

कृष्ण प्रकाश आपल्या धडाकेबाज कारवायांसाठी प्रसिद्ध आहेत. याआधी त्यांनी अहमदनगरमध्ये गुन्हेगार टोळ्यांवर केलेल्या कारवाईनंतर ते महाराष्ट्रभरात चर्चेत होते. सध्या ते पिंपरी चिंचवड येथे पोलीस आयुक्त म्हणून काम करत आहेत. नियमप्रिय आणि शिस्तप्रिय पोलीस अधिकारी म्हणून कृष्ण प्रकाश यांचा लौकिक आहे. ते त्यांच्या फिटनेससाठी देखील ओळखले जातात. त्यांनी अनेक मॅरेथॉन स्पर्धांमध्ये भाग घेतलाय. मात्र, हा विक्रम त्यांच्यासह पोलीस विभागाचाही सन्मान वाढवणारा ठरलाय.

कृष्ण प्रकाश यांनी आज (20 जानेवारी) सकाळी सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांची नोंद वर्ल्ड बूक ऑफ रेकॉर्डमध्ये झाल्याची माहिती दिली. यासोबत त्यांनी त्यांचे काही फोटोही शेअर केले. यात त्यांना या विक्रमासाठी एक प्रमाणपत्र देऊन सन्मानित केल्याचंही दिसत आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments