खासदारश्री.छ. उदयनराजे भोसले यांनी त्यांच्या कॉलर उडवण्याच्या स्टाईलवर होणाऱ्या चर्चेला ज्या प्रमाणे दादा कोंडकेची नाडी सोडायची स्टाईल होती .तशी माझी हि कॉलरच्या स्टाईलमुळे कोणाला अडचण येण्याची कारण नाही .अशा शब्दात उत्तर दिले .ते भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृती निमित्त परळी येथील आयोजित कार्यक्रमात बोलत होते .
यावेळी ते म्हणाले अलीकडच्या काळात अनेक मान्यवर मंत्र्यांनी ,आजी माजी लोकांनी कारण नसताना माझ्या कॉलर उडवण्याच्या स्टाईलवर टीका टिप्पणी केली .मला समजत नाही .त्यांना मी एकच उत्तर दिले .दादा कोंडकेची नाडीची ज्या प्रमाणे स्टाईल होती.तशी हि माझी स्टाईल असल्यामुळे याची कोणाला अडचण येण्यासारखे काही नाही .असा टोला त्यांनी लगावला . राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत काही दिवसापूर्वी उदयनराजे भोसले यांच्याप्रमाणे कॉलर उडवत त्यांच्या या स्टाईलवर भाष्य केले होते.उदयनराजे यांनी त्यावेळीही पवार यांच्या वक्तव्यावर भाष्य केले होते.