राष्ट्र सेवा दल आणि महाराष्ट्रातील एक हजार सामाजिक संस्था ,संघटना ,युनियन आणि व्यक्ती यांच्या प्रयत्नातून सुरु झालेल्या ‘महाराष्ट्र सोशल फोरोम’च्या समारोप सत्रात बोलतांना वरिष्ठ पत्रकार रविश कुमार यांनी लोकशाहीच्या मजबुती साठी सर्वसामान्य नागरिक यांनीच स्वतःमधला विरोधी पक्ष जागृत करून शासन नावाच्या यंत्रणेला जबाबदार केले पाहिजे . लोक प्रतिनिधींना लोकांप्रती उत्तरदायी केले पाहिजे याचे महत्व पटवून सागिंतले पाहिजे .
आपल्या विषयाचे विवेचन करतांना पुढे ते म्हणाले की ,स्थालांतरित मंजूर रोजगारासाठी ज्या राज्यात गेले होते . तिथून आपल्या राज्यात परत आले . परत येताना त्यांनी अनेक यातना भोगल्या पण ते जेव्हा आपल्या गावात पोहचले तेव्हा मात्र हे दुःख विसरून गेले आहेत . हे लोकशाही साठी फार घातक आहे . लोकशाही टिकवण्यासाठी लाखो लोक वेगवेगळया राजकीय पक्षात काम करतात , लोकतंत्र मजबुती ,पण ते त्यांच्या पक्षातही लोकशाही टिकावी यासाठी आग्रही नसतात त्यांच्या कडून अमलात येणारे कार्यक्रम वरून आलेले आदेश समजून केले जातात हे घातक आहे . आज देश अडचणीत आहे तर लोकशाही मध्ये सर्वात महत्वाची असलेली लोकसभा ,विधानसभा ,का बंद आहेत . असा प्रश्न नागरिक विचारत नाहीत . जे लोक आपण या सभागृहात आपले प्रतिनिधी म्हणून पाठवले आहेत . त्यांना लोकांच्या प्रश्नाची जाण आहे कि नाही ,हे प्रश्न ते संसदेत मांडत आहे कि नाही याचा जाब जोपर्यंत लोक विचारणार नाहीत तोपर्यंत ‘लोकशाही ‘ टिकणार नाही . मजबूत होणार नाही.
आज आपल्याला परत एकदा गांधीजी समजावून घेऊन त्या मार्गाने जाण्याची गरज आहे . गांधीजी हे आपल्या देशातील मोठे ‘संवादक ‘होते . ते सतत लोकांशी बोलत होते . पण आज मात्र लोकांना न भेटता यंत्राच्या मार्गाने बोलण्याचा ,अभिव्यक्त होण्याचा मार्ग अबलंबतो आहोत . हि मशीन रुपी व्यासपीठ तिच्या ‘अल्गोरिदम ‘च्या तालावर आजच्या युवा पिढीला चुकीची माहिती पसरवत आहेत . हे संविधान प्रेमी लोकांसाठी अडचणीचे आहे . यातून बाहेर पडण्यासाठी आपल्याला ‘लाईक -डिसलाईक ‘ च्या खेळातून बाहेर पडायला हवे . कारण हा खेळ त्या गुंत्यात अडकवतो . ज्यातून आपण फक्त ‘प्रतिक्रियावादी ‘बनतो आणि याचा शेवट नकारात्मक होताना आपल्याला लक्षात येईल . गांधीजी सतत संघर्ष आणि रचना याचे संतुलन साधत होते . ते जितके रस्त्यावरच्या संघर्षात रमत होते तेवढेच श्रमाला किंमत देणाऱ्या ‘ सूत कताई ‘ मध्येच स्वतःला गुंतवत होते . सध्या असलेल्या सोशल मीडिया मध्ये अडकण्यापेक्षा लोकांमध्ये जाण्याची गरज आहे म्हणजे आपण संविधानाच्या कामासाठी स्वतःचा वेळ देऊ शकू
आपल्या देशात अजूनही संवेदनशीलता आहे याचा विश्वास लॉक डाउनच्या काळात आपल्याला मिळाला . जे सर्वसाम्यान नागरिक कधीही सामाजिककामात सक्रिय नसतात ते लोक स्थालांतरितांच्या दुःखाला प्रतिसाद देत ,स्वतःच्या प्रेरणेने भुकेल्यांना जेवण देत होते . ह्या लोकांशी बोलण्याची गरज आहे . मोठ्या संख्येने हिंसाचाराचे समर्थन करण्याऱ्या लोकांशी बोलण्याची गरज आहे कारण आपण परिवर्तनावर ठेवणारे कार्यकर्ते आहोत . सध्याच्या मीडिया मध्ये तुम्ही लोकशाहीचा आधार शोधण्यात वेळ घालवू नका . यात सहभागी व्हा पण यावर अवलूंबन राहू नका . मीडियात बदल होईल याची वाट पाहत बसू नका . कारण हा मीडिया ‘अल्गोरिदम ‘च्या ताब्यात गेला आहे . दोन प्रकारचे लोक आपल्याकडे आहेत एक आहेत आपल्या सारखे संवेदनशील कारकर्ते जे सतत सत्ताधारी लोकांना गरिबांसाठी जाब विचारत राहतील पण दुसऱ्या लोकांचा प्रकार आहे जो ‘स्टेट ‘चा आवाज अधिक मोठा करण्यासाठी स्वतःचा आवाज वापरतात . अशा स्टेटच्या लोकांनी आज मीडिया ,सोशल मीडिया भरलेला आहे . अशा लोकांनां दुरूस्त करण्यात वेळ ,श्रम घालवण्यापेक्षा गांधीजी सारखा ‘रचनात्मक ‘ कामात गुंतवला पाहिजे . आपण आपल्या कडील ज्ञान मर्यादित करून ठेवले आहे . पण स्टेट ‘च्या लोकांनी मात्र त्यांचे अज्ञान याचा प्रचार करून तेच ज्ञान आहे हे सिद्ध करण्यासाठी ‘सोशल मीडिया ]वापरला जातो आहे आणि आपण त्याला प्रतिउत्तर देण्यात आपला वेळ ,श्रम वाया घालवत आहोत . त्यामुळे त्यांच्या कडून काही सूचना येईल हि अपेक्षा करून अडकू नका.
आज गुगल ,फेसबुक ,ट्विटर तुम्हाला खूप श्रम करून हि लोकांपर्यंत पोचू देणार नाही . हि माध्यम नक्की शिका पण ती आली नाही म्हणून स्वतःला कमी समजू नका . त्याऐवजी कदाचित संख्येने कमी पण लोकांशी प्रत्यक्ष बोलून ,गांधीजी सारखे जाऊन लोकांशी बोलण्याचे काम केले पाहिजे . चांगल्या पुस्तकांचा प्रचार करायला हवा . ज्ञानाचा प्रचार करायला हवा . महाराष्ट्र सोशल फोरोम मध्ये आज जे जे कार्यकर्ते सहभागी झाले आहेत . त्यांनी स्वतःमध्ये हा विश्वास केला पाहिजे ,वाढवला पाहिजे कि आज देशाला तुमची खूपच गरज आहे,आपणच देशाला या संकटातून बाहेर काढू शकू . लढाई अवघड आहे पण अशक्य नाही .अशक्य तेव्हाच वाटेल जेव्हा तुम्ही रोज दूरदर्शन पाहाल . म्हणून त्या पासून दूर राहा .
समारोपाच्या सत्राचे स्वागत आणि आत्ता पर्यंत झालेल्या प्रक्रियेची माहिती महाराष्ट्र सोशल फोरम चे समन्वयक नितीन मते आणि अनिता पगारे यांनी दिली . त्यानंतर सुभाष वारे यांनी सर्व जिल्ह्यामध्ये ह्या प्रक्रियेत व्यक्त झालेले ठराव याची मांडणी केली . तसेच लोकशाहीर संभाजी भगत यांनी ‘संविधानाचा प्रचार राज्याची भूमिका तसेच त्यासाठी शिक्षकांचे प्रशिक्षण ‘ यासाठी सुरु असलेल्या चळवळीची माहिती दिली . ह्या अभियानात राज्याच्या शिक्षण मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीची माहिती दिली . तसेच त्यांनी संविधाना संदर्भात एक गाणे सादर केले .
महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीचे अध्वायू ,सत्यशोधक परिवर्तनवादी प्रणेते डॉ . बाबा आढाव याचा सर्व आयोजक संस्थांच्या वतीने जाहीर लोक सत्कार करण्यात आला . हमाल पंचायतीचे संस्थापक ,एक गाव एक पाणवठा चळवळीचे संयोजक ,राजस्थानच्या हाय कोर्टा समोरील मनूचा पुतळा काढा हि मागणी घेऊन दिल्ल्ली गाठणारे बाबा आढाव याचा परिचय करून दिला . कार्यकर्त्यांना आशीर्वाद देताना बाबा आढाव म्हणाले गांधीजींच्या मार्गाने जाताना ‘तुरंग ‘अपरिहार्य आहे हे विसरू नका . प्रशांत भूषण यांना तुरंगात पाठवले तर मला तो गौरव वाटेल . आज रस्त्यावर येऊन कायदेभंग करण्याची आवश्यकता आहे . तुरुंग ‘फावड आणि मतपेटी हे चळवळीचे प्रतीके आहेत . ती टिकवायला हवी . मजबूत करायला हवी . संविधान टिकवाचे असेल तर फक्त असंघटित मजुरांच्या प्रश्नारवर फक्त बोलून चालणार नाही तर ह्या वर्गाच्या डोक्यात संविधानाची मूल्ये रुजवावी लागतील . जे जे कोणी संविधानाचे अवमूल्यन करेल त्या सर्व शक्तीच्या विरुद्ध सत्याग्रह करण्याची गरज आहे . अशा सत्याग्रहात मला बोलवा ,त्याची मी वाट पाहतो आहे.
राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी समारोपाच्या निवेदनात आत्ता पर्यंत झालेल्या प्रक्रियेची माहिती देताना मला सत्याग्रहात सहभागी व्ह्याला आवडेल . तसा सत्याग्रह लवकरच होईल आणि त्यात मी बाबा आढाव यांचे बरोबर राहील आणि तुरंगात जाईल . एक रुपयांच्या खर्चा शिवाय हि प्रक्रिया चालती . कारण हि प्रक्रिया हि देशाची गरज आहे . आणि ह्या गरजेला देशातील नारिकांनी उस्फुर्तपणे ,भरघोस प्रतिसाद दिला . संविधान मानणारे अनेक कार्यकर्ते ,छोट्या -मोठ्या संघटना एकाच सुरात बोलत होते आणि तो सूर होता की ,आपण सर्वाना एकत्र येण्याची आवश्यकता आहे . सर्व जिल्ह्यांनी काह ठराव केले आहेत . ते ठराव फक्त राज्याच्या ,केंद्राच्या पुढे विनवण्या करण्यासाठीचे ठराव नाही तर ज्या जनतेच्या पाठींब्यावर हि सत्ता चालते तिच्या समोर मांडले जाणार आहे . भविष्यात आपण सर्व मिळून जातीच्या पिंजऱ्यातून बाहेर येऊन समान मानवाची लढाई करणार आहोत . सध्याची ढासळेलेली अर्थ व्यवस्था दुरुस्त करण्यासाठी शासन काय करेल याची वाट न पाहता आता लोक उभे राहावेत यासाठी आपण सगळे मिळून काम करणार आहोत . आपण आपल्या संकल्पना तयार करूयात .
आज जर सर्वसामान्य नारिकाना संविधान संदर्भात अजमावल केली तर मी नक्की सांगेन कि ते संविधानाला मानतात . त्यामुळे बहुसंख्यांक लोक हे संविधान प्रेमी आहेत . देशातल्या १०३ कोटी जनतेने सध्या सत्तेत असलेल्या धर्माध ,सतत खोटे बोलणाऱ्या,गुप्त कारवाया करणाऱ्या ,टाळ्या वाजवणाऱ्या पक्षाला मतदान केलेले नाही हे आपण लक्षात ठेवले पाहिजे . आपल्याला संविधान गावापर्यंत वाहत नेले पाहिजे त्यासाठी आपल्याला गावागावा पर्यंत जावं लागेल . त्यासाठी आपल्याला शिवाजी महाराजांचे मावळे बनायला हवे .,सावित्रियाच्या लेकी बनायला हवं ‘गांधीजींचे सत्याग्रही बनले पाहिजे ,बाबासाहेबांच्या विचारांचे पाईक व्हावे लागेल . उद्या उत्तर भारतातील बैठक होणार आहे . पुढे दक्षिणेत चळवळ होते आहे . त्यांना महाराष्ट्राकडून वैचारिक भूक भागवली जाण्याची अपेक्षा आहे . ती अपेक्षा महाराष्ट्र नक्की पूर्ण करेल . संविधान ,संस्कृती आणि समाज आपल्याला भविष्यात घडवायचे ,टिकवायचे आहे . राष्ट्र सेवा दल यात असेल पण त्यात आपल्या सारखे हजारो संस्था ,संघटना ,व्यक्ती यांनी उद्या पासून कार्यरत होण्याची गरज आहे . साथी हाथ बढाना असे म्हणत आठ दशकाच्या ह्या प्रवाहात राष्ट्र सेवा दलाने असंख्य कारकर्ते घडवले तो प्रवाह असाच सुरु राहील . शेवटी नितीन मते यांनी सर्वांचे आभार मानले .