Sunday, August 10, 2025
HomeMain Newsलस प्रभावी आहे हे कसं समजतं? भारतासाठी कोणती लस चांगली?

लस प्रभावी आहे हे कसं समजतं? भारतासाठी कोणती लस चांगली?

कोरोना लसीबाबत दररोज नवे अपडेट येत आहेत. फायझर आणि मॉडर्ना नंतर आता ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने देखील आपली लस प्रभावी असल्याचा दावा केला आहे. फायझर आणि मॉडर्नाच्या लसी 90 टक्क्यांपेक्षा जास्त प्रभावी असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीची लस 70 टक्के प्रभावी असल्याचा दावा करण्यात आला आहे. भारतातही कोवॅक्सिन, सीरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्ड लस आणि जायडस कंपनीची लस मानवी चाचण्यांच्या सर्व टप्प्यांमध्ये प्रभावी असल्याचं समोर येत आहे (Which Corona Vaccine is effective).

लस किती प्रभावशाली आहे हे कसं कळतं?

लस किती प्रभावशाली आहे त्या लसीच्या विविध प्रकारच्या चाचण्यांमध्ये समोर येतं. या चाचणीत सहभागी असलेल्या स्वयंसेवकांच्या संख्यांच्या गुणोत्तरावर लस किती प्रभावशाली हे स्पष्ट होतं. सामान्य भाषेत सांगायचं झालं तर समजा लसीच्या मानवी चाचणीत 10 हजार स्वयंसेवक सहभागी झाले. यापैकी 5 हजार स्वयंसेवकांना लसीचा डोज दिला आणि इतर 5 हजार स्वयंसेवकांवर अन्य उपचार केला.

समजा लस देण्यात आलेल्या गटातील 20 टक्के लोकांना म्हणजे 500 लोकांना संसर्ग झाला. दुसरीकडे ज्या 5000 लोकांना लस दिलेली नाही त्यापैकी 1000 लोकांना संसर्ग झाला तर ती लस 50 टक्के प्रभावी आहे असं मानलं जातं (Which Corona Vaccine is effective).

जर 1000 लोकांना डोज दिल्यानंतर 400 लोकांना संसर्ग झाला तर याचा अर्थ लसीमुळे 600 लोकांना संसर्ग झाला नाही. याचा अर्थ ही लस 60 टक्के प्रभावी आहे. समजा 300 लोकांना संसर्ग झाला तर लस 70 टक्के आणि 200 टक्के लोकांना संसर्ग झाला तर लस 80 टक्के प्रभावी मानली जाईल.

भारतासाठी कोणती लस चांगली राहील?

प्रसिद्ध शास्त्रज्ञ गगनदीप कांग यांनी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत भारतासाठी कोणती लस चांगली असेल यावर भाष्य केलं होतं. “जी लस कमी किंमतीची असेल आणि तिचं कमी वेळात जास्तीत जास्त उत्पादन होईल, अशी लस भारताला परवडेल”, असं गगनदीप कांग म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments