Wednesday, March 4, 2026
HomeMain Newsरिझर्व्ह बँकेचे एचडीएफसी बँकेला नवीन क्रेडिट कार्ड व डिजिटल लाँचेस थांबवण्याचे आदेश

रिझर्व्ह बँकेचे एचडीएफसी बँकेला नवीन क्रेडिट कार्ड व डिजिटल लाँचेस थांबवण्याचे आदेश

भारतीय रिझर्व्ह बँकेने एचडीएफसी बँकेवर नवीन क्रेडिट कार्ड ग्राहक जोडण्यासोबतच सर्व प्रकारच्या डिजिटल व्यवसायातील नवे व्यवहार सुरू करण्यास तात्पुरती बंदी घातली आहे. खासगी क्षेत्रातील बड्या अशा एचडीएफसी बँकेला हा झटका असल्याचे मानण्यात येत आहे.

मुंबई शेअर बाजाराला पत्र पाठवून एचडीएफसी बँकेने सांगितले आहे की, दोन डिसेंबर रोजी सदर आदेश रिझर्व्ह बँकेने जारी केला आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये काही वेळा एचडीएफसीच्या बँकेच्या इंटरनेट बँकिंग, मोबाइल बँकिंग व पेमेंट युटिलिटीसंदर्भात व्यत्यय येण्याचे प्रकार घडले होते. यामध्ये बँकेच्या प्रायमरी डेटा सेंटरमध्ये २१ नोव्हेंबर रोजी वीजपुरवठा बंद झाल्याच्या घटनेचाही समावेश असल्यामुळे इंटरनेट बँकिंग व पेमेंट यंत्रणेत व्यत्यय आला होता.

रिझर्व्ह बँकेने या प्रकारांमागील त्रुटी दूर करण्यास व या घटनांची जबाबदारी कुणाची हे निश्चित करण्यासही सांगितल्याचे एचडीएफसी बँकेने नमूद केले आहे. आयटी यंत्रणेवर आम्ही काम करत असून लवकरात लवकर यंत्रणा ठीक करू तसेच आरबीआयच्या संपर्कात राहू अशी हमी एचडीएफसी बँकेने दिली आहे. बँकेच्या एकूण व्यवसायावर या निर्बंधांचा विपरीत परिणाम होणार नसल्याचा विश्वासही एचडीएफसी बँकेने व्यक्त केला आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments