Friday, August 8, 2025
HomeMain Newsराष्ट्रीय लोक अदालतीत सातारा जिल्ह्यातील १० हजार १२२ प्रकरणे चर्चेसाठी

राष्ट्रीय लोक अदालतीत सातारा जिल्ह्यातील १० हजार १२२ प्रकरणे चर्चेसाठी

सातारा जिल्ह्यातील सर्व न्यालयांमध्ये  राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते . या अदालतीमध्ये जास्ती जास्त पक्षकारांनी लाभ घेऊन आपली प्रकरणे तडजोडीने मिटवावीत ,असे आव्हान जिल्हा सत्र न्यायाधीश एम.जे धोटे यांनी केले . जिल्हा न्यालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन आज करण्यात आले होते . या लोकअदालतीचे उदघाटन जिल्हा सत्र न्यायाधीस एम .जे . धोटे यांच्या हस्ते झाले . या प्रसंगी जिल्हा न्यायाधीस एन.एल.मोरे ,जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव तृपती  जाधव ,वकील संघाचे अध्यक्ष सुखदेव पाटील ,जिल्हा सरकारी वकील ऍड.. महेश कुलकर्णी आदी उपस्थित होते . या प्रसंगी बोलताना जिल्हा सत्र न्यायाधीश एम .जे . धोटे  म्हणाल्या कि ,राष्ट्रीय लोकअदालत ही पक्षकारांच्या कल्याणासाठी असून यामध्ये कोणत्याही पक्षकारांचे नुकसान केले जात नाही . लोकअदालतीमुळे पक्षकारांचा वेळ ,पैसा ,वाचणार आहे . आज आयोजित करण्यात आलेल्या लोकअदालतीमध्ये जास्ती जास्त पक्षकारांनी सहभाग नोंदवून आपली प्रकरणे निकालात काढावीत ,असे आव्हान त्यांनी केले .

आजच्या राष्ट्रीय लोकअदालतीत धनादेश न वटलेली प्रकरणे ,वादपूर्व प्रकरणे ,वैवाहिक वाद,थकीत ग्रामपंचायतीची मालमत्ता कर व पाणी बिलाची प्रकरणे ठेवण्यात आली होती . जिल्ह्यातील प्रलंबित सुमारे १० हजार १२२ प्रकरणे चर्चेसाठी ठेवली होती . तसेच ग्रामपंचायतीची थकीत पाणीपट्टी व घरपट्टी वादपूर्व प्रकरणासाठी पंचायत समिती ,सातारा येथे एक पॅनल ठेवण्यात आले होते . अशी माहिती प्रस्ताविकात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव तृपती जाधव यांनी दिली . या कार्यक्रमास जिल्हा न्यालयातील न्यायाधीश ,वकील ,पक्षकार उपस्थित होते .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments