Thursday, August 7, 2025
HomeMain Newsराष्ट्रवादीने विरोधकांचा उडवला धुव्वा! वाई बाजारसमितीत मिळवली एकहाती सत्ता

राष्ट्रवादीने विरोधकांचा उडवला धुव्वा! वाई बाजारसमितीत मिळवली एकहाती सत्ता

वाई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आमदार मकरंद पाटील यांच्य़ा नेतृत्वाखालील राष्ट्रवादीने एक हाती सत्ता मिळवत विरोधी शेतकरी विकास परिवर्तन पॅनलचा धुव्वा उडविला.

१८ उमेदवारांसाठी लढलेल्य़ा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सहा जागा बिनविरोध निवडून आल्य़ा होत्या. तर विरोधकांची एक जागा बिनविरोध झाली होती.

विजयी झालेल्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांमध्ये विकास सेवा सोसायटी मतदार संघातून केशव शंकर गाढवे, रमेश व्यंकटेश गायकवाड, पोपट गणपत जगताप, मोहन सर्जेराव जाधव, राहुल मधुकर डेरे, रविंद्र संपत मांढरे, विनायक प्रभाकर येवले, ग्रामपंचायत मतदार संघातून तानाजी बरमाराम कचरे, दत्तात्रय शिवाजीराव बांदल, तर व्यापारी आडते मतदार संघातून तुकाराम रघुनाथ जेधे, नानासो गणपतराव शिंदे हे निवडून आले आहेत.

राष्ट्रवादीचे बिनविरोध झालेले उमेदवार :

भटक्या जाती-जमाती गट : राहुल साळू वळकुंदे,
इतर मागास गट : संजय बंडू मोहळकर,
महिला राखीव गट : श्रीमती शकुंतला चंद्रकांत सावंत, संगीता शंकर भंगे,
ग्रामपंचायत अनुसूचित जाती- जमाती : अशोक सावळाराम सोनावणे,
हमाल नापाडी गट : सचिन भानुदास फरांदे,
भटका विमुक्त गट : विवेक वसंतराव भोसले (विरोधी आघाडी)

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments