Friday, August 8, 2025
HomeMain Newsराष्ट्रपतींच्या अभिभाषणावर 16 विरोधी पक्षांचा बहिष्कार

राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर 16 विरोधी पक्षांचा बहिष्कार

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या 29 जानेवारीपासून सुरु होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनमधील अभिभाषणावर विरोधी पक्षांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत 16 राजकीय पक्षांनी प्रसिद्धीत्रक जारी केले आहे. हा निर्णय ज्या पद्धतीने कृषी कायदे लादण्यात आले त्याचा विरोध दर्शवण्यासाठी घेण्यात आल्याची माहिती राज्यसभेतील विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी दिली.

काँग्रेससह विरोधी पक्षांचे केंद्र सरकारनं मजूर केलेल्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन सुरु आहे. विरोधी पक्षांकडून यादरम्यान पुढील टप्पा म्हणून राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकण्यात येणार आहे. उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. भारतीय संसदीय पद्धतीप्रमाणे राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने संसदेच्या अधिवेशनाची सुरुवात केली जाते.

गुलाम नबी आझाद यांनी दिलेल्या माहितीनुसार कृषी कायदे हे राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकण्याचे प्रमुख कारण आहे. कारण, विरोधी पक्षांना विश्वासात न घेता सरकारने हे कायदे मंजूर केले आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, जेकेएनसी, द्रमुक, तृणमूल काँग्रेस, शिवसेना, समाजवादी पार्टी, राष्ट्रीय जनता दल, सीपीआय (एम), सीपीआय, आययूएमएल, आरएसपी, पीडीप, एमडीएमके, केरळ काँग्रेस, अेआययूडीएफ या राजकीय पक्षांचा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणावर बहिष्कार टाकणाऱ्या पक्षांमध्ये समावेश आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments