Friday, August 8, 2025
HomeMain Newsराकेश टिकैत यांची शेतकरी आंदोलनाबाबत मोठी घोषणा

राकेश टिकैत यांची शेतकरी आंदोलनाबाबत मोठी घोषणा

राजधानी दिल्लीच्या वेशीवर नव्या कृषी कायद्यांविरोधात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचे स्वरुप दिवसेंदिवस वाढत चालले असून नव्या कृषी कायद्यांसंबंधी देशभरात जागृती करण्याचा निर्धार भारतीय किसान युनिअनने व्यक्त केला आहे. देशातील वेगवेगळ्या भागात जाऊन आपण मोहीम राबवणार असल्याचे भारतीय किसान युनिअनचे नेते राकेश टिकैत यांनी जाहीर केले आहे. तर दुसरीकडे६ फेब्रुवारीला देशव्यापी ‘चक्का जाम’ची घोषणादेखील शेतकऱ्यांनी केली आहे. या सर्व घडामोडींदरम्यान राकेश टिकैत यांनी शेतकरी आंदोलनासंबंधी एक मोठी घोषणा केली आहे.

जोपर्यंत कायदा मागे घेत नाही, तोपर्यंत घऱवापसी नाही, असा नारा राकेश टिकैत यांनी दिला आहे. त्यांनी यावेळी शेतकरी आंदोलन ऑक्टोबरच्या आधी संपणार नसल्याचे मोठे वक्तव्य केले आहे. ऑक्टोबरच्या आधी हे आंदोलन संपणार नाही. हे आंदोलन लवकर संपणार नसल्याचे ते म्हणाले आहेत.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments