Sunday, August 10, 2025
HomeMain News‘या’ व्यक्तीमुळे झाली आनंद महिंद्रांची बोलती बंद

‘या’ व्यक्तीमुळे झाली आनंद महिंद्रांची बोलती बंद

सोशल मीडियावर खास करून ट्विटरवर महिंद्रा अँड महिंद्राचे चेअरमन आनंद महिंद्रा फार सक्रिय असतात. आनंद महिंद्रांच्या सर्वसमावेशक ट्विटसमुळे त्यांचा स्वतःचा असा वेगळा चाहतावर्ग आहे. त्याचबरोबर आपल्या हजरजबाबी स्वभावामुळे आनंद महिंद्रा कायमच चर्चेत असतात. पण यावेळी आनंद महिंद्रा यांची बोलती बंद झाली आहे. ट्विटरवर आनंद महिंद्रा यांनी काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये दोन प्रकारचे फेस मास्क दाखवले आहेत. एका मास्कवर ‘लडके वाले’ तर दुसऱ्या मास्कवर ‘लडकी वाले’ असे लिहिले आहे.

आनंद महिंद्रा यांनी हे फोटो शेअर करुन लिहिले आहे की, मला माहित नाही हे बघून मी खुश होऊ की घाबरू. खरच या मास्कने माझी बोलती बंद केली आहे. आपण या मास्कवरून अंदाज लावू शकतो की, कशा पद्धतीने लग्न सोहळ्यात मास्क डिझाइन केले जातात. हे मास्क वधु आणि वर पक्षाची मंडळी घालणार आहेत. लग्नसोहळे कोरोनाच्या काळात होत आहेत. पण त्यातही योग्य ती काळजी घेऊन कार्यक्रम पार पडले जात आहेत. आनंद महिंद्रा यांच्या ट्विटवर अगदी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. काहींनी लग्नात सॅनिटाइझर वाटत असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. आपल्या ट्विट्समुळे आनंद महिंद्रा कायमच चर्चेत असतात. सध्या तसेच हे ट्विट व्हायरल होत आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments