Monday, August 11, 2025
HomeMain Newsमुंबई काँग्रेस अध्यक्षपदी भाई जगताप यांची निवड

मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी भाई जगताप यांची निवड

 काँग्रेसच्या अध्यक्षपदी विधान परिषदेचे आमदार भाई जगताप यांची निवड झाली आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी जगतापांच्या नावावर शिक्कामोर्तब केलंय. विद्यमान अध्यक्ष आणि माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्याविषयी पक्षांतर्गत नाराजी वाढल्याची चर्चा होती. त्यामुळे मुंबई काँग्रेसमध्ये खांदेपालट करण्यात आले. अखेर मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी भाई जगताप यांची निवड झाली.

कार्यकारी समितीच्या अध्यक्षपदी चरण सिंग सप्रा यांची नियुक्ती केली आहे. प्रचार समितीच्या प्रमुखपदी मोहम्मद आरिफ नसीम खान यांची निवड केली. समन्वय समितीच्या प्रमुखपदी डॉ. अमरजित सिंग मनहास यांची नियुक्ती झाली.

विशेष म्हणजे भाजपाने आगामी मुंबई पालिका निवडणुकीसाठी मराठमोळ्या अतुल भातखळकरांकडे जबाबदारी दिली. त्यात आता काँग्रेसनेही भाई जगताप यांची मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी निवड करून मराठी चेहरा देण्याचा प्रयत्न केलाय. आगामी मुंबई पालिका निवडणूक ही मराठी विरुद्ध मराठी नेते अशी झाली तर आश्चर्य वाटायला नको.अशोक जगताप यांची भाई जगताप या नावाने ओळखभाई जगताप काँग्रेसच्या तिकीटावर विधान परिषद आमदार.जगताप यांच्या आमदारकीची दुसरी टर्मभाई जगताप याआधी विधानसभेवरही निवडून गेले होते, मात्र गेल्या निवडणुकीत पराभव

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments