Friday, August 8, 2025
HomeMain Newsमुंबईत दाखल झाला ट्रिपल तलाकचा पहिला गुन्हा

मुंबईत दाखल झाला ट्रिपल तलाकचा पहिला गुन्हा

‘मुस्लिम महिला विवाह संरक्षण कायदा’ अंतर्गत आपल्या पती विरोधात मुंब्र्यातील एका महिलेने तक्रार दाखल केली आहे. व्हॉट्सअॅपवर तिच्या पतीने 3 वेळा तलाक असे लिहून गेल्यावर्षीच तिला घटस्फोट दिला होता. या महिलेने त्यामुळे त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. नव्याने बनवण्यात आलेल्या ट्रिपल तलाक कायद्याअंतर्गत पोलिसांनी तिच्या पतीवर गुन्हा दाखल केला आहे.

एमबीए पर्यंत या महिलेचे झालेले असून, 6 महिन्यांचा तिला मुलगा आहे. इम्तियाज गुलाम पटेल असे पतीचे नाव असून तो 35 वर्षांचा आहे. त्याने गेल्यावर्षी आपल्या पत्नीला व्हॉट्सअपवर तलाक दिला होता. तो तलाक दिल्यानंतर गेल्यावर्षीपासून दुसऱ्या महिलेसोबत लग्न करून राहत असल्याची तक्रार या महिलेने केली आहे. पतीसोबतच सासू आणि नणंद यांच्याबद्दलही या महिलेने छळ होत असल्याची तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी महिलेच्या तक्रारीनंतर ‘मुस्लिम महिला विवाह संरक्षण कायदा’ अंतर्गत या पुरूषावर गुन्हे दाखल केले आहेत. या कायद्यात अंतर्गत विना जामीनपात्र गुन्हा व 3 वर्ष कारावासाची शिक्षेची तरतूद आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments