तू काहीही कर कितीही शिक मात्र आंतरजातीय प्रेमविवाह करू नकोस . अकरावीला सायकलच्या कॅरेजवर बसून वस्तीच्या रस्त्यावरुन तालुक्याला प्रवेशासाठी चाललेले होते . वडील सायकल चालवत होते . मी काहीच बोलले नाही . १३ वर्षांच्या वयात काय कळणार होतं म्हणा . मात्र वडील यापूर्वी हे करू नको रे असं कधीच म्हणाले न्हवते . त्यामुळे आता जे बोलले ते काहीतरी गंभीर असणार एवढं कळलेलं . काही महिन्यापूर्वी शेजारच्या गावातील एका मुलीनं आंतरजातीय लग्न केलं होते . आणि या धक्याने तिचे वडील हार्ट अटॅक येऊन वारले असं मोठी मानस एकमेकांसोबत कुजबुजायची शेवटी बाप हा अक्खा बाप नसतो तो अर्धा समाज असतो . प्रेम जात पाहून कधीच होत नसते . अरेन्ज लग्नामध्ये आई वडील मुलीचं आर्थिक स्थैर्य पाहतात तर मुलाकडचे मुलीचं सौदर्य प्रेम विवाहात मुलगा मुलगी एकमेकांच्या आवडीनिवडी विचार वागणं मूल्य तसेच आर्थिक स्थैर्य पाहतात . जात व्यवस्था आंतर जातीय किंवा प्रेम विवाह करणं अथवा अगदी अरेन्ज मॅरेजसाठी मुलगा सुचवणं आणि मुलाने अंतरजातीय लग्न करणं मुलगी निवडणे यात खूप फरक आहे . मुलगा पुरुष असल्याने तो हि गोष्ट केली तरी त्याला माफी मिळते स्वीकार होतो . महाराष्ट्र किंवा इतर राज्यातील आडकडेवारी पाहिल्यास आंतरजातीय किंवा प्रेम विवाहातून खून झालेल्या मुलींची संख्या बहुतवशी आहे .
मुलांनी स्वतःच्या आयुष्यचा निर्णय घेणं अभिप्रेत आहे आणि मुलींनी आपल्या पालकांच्या मतानुसार घेणे . संभाजीनगरच्या घटनेतसुद्धा लग्न केलं हि अहंकार दुखावणारी इज्जत घालवणारी गोष्ट त्यांना सहन झाली नाही . मुलगी स्वतःचा निर्णयच कशी काय घेऊ शकते . हा मुद्दा पुरुषसत्ताक व्यस्थेत आव्हान देणारी गोष्ट समजली जाते .
म्हणून तर नवऱ्याचा खून झाल्याची गोष्ट बाजूला सारून त्या मुलीनं कसं वडिलांना फसवले म्हणून तिला दोष देण्याची मानसिकता प्रबळ आहे .
मुलगा गोंधळी समाजातील असला तरी बौद्ध पद्धतीने लग्न केलं होतं . कदाचित हि सुद्धा अहंकार दुखावणारी गोष्ट वाटली असावी . मुलीचा नवरा आम्हाला उघडउघड आव्हान देतो , डिवचतो या विचारनं पुरुषार्थ उफाळून येतो आणि अमितसारख्या नुकतंच आयुष्य सुरु केलेल्या तरुणाचा जीव जातो . अशा अनेक बाप भावना जेलमध्ये आयुष्य घालवल्यासारखे देखील किंचीत हि पच्यताप होताना दिसत नाही . समाजातही यांची वाहवा होते . पितृसत्ताक फक्त जात व्यवस्था बळकट करत नाही . ती प्रत्येक टप्प्यावरील अक्ख स्त्री जीवन कंट्रोल करते . पितृसत्ताक ,जात धर्म ,वंश द्वेष ,असुरक्षित नियोजन पूर्वक पेरली जाते . हा तिरस्कार अस्तिव संघर्षाच्या पुढचा असतो . गेल्या काही वर्षात तर याला आणखीनच खतपाणी घातले जात आहे . व्यवस्था पुरस्कृत हिवसेला ओळखायला मानस कमी पडत आहेत . तोवर असे बळी जात राहतील . या आगीत सगळ्यांचीच घरे जळणार आहेत .
अशा वेळी अहीवंसा सांगणारा बुद्ध अहंकारी ,अशा सत्तांध पुरुषार्था समोर फिका पडतो . राहता राहिली गोष्ट बौद्ध समाजातील वडील भावाने खून करण्याची ,तर प्रत्येकच जात ,धर्मात देशात थोर विचारवंत ,समाजसुधारक होऊन गेले आहेत . बुद्ध धर्माचा स्वीकार बाबासाहेब आंबेडरकरांनी वेगळ्या ,सुधारक विचारांनी केला होता . म्हुणुन बौद्ध धर्मातील माणसांकडून विवेकी विचार आणि सारासार कृतीची जास्त अपेक्षा आहे . वारसा,थोरवी ,सांगायची बुद्धाची ,शिवाजी महाराज ,शाहू महाराज ,फुले ,यांची वर्तणूक प्रतिगामी पितृसत्ताक मनुची हि आपल्याकडील समाजव्यस्था आहे . महान विचार बाळगणे सोपे आहे . गर्वाची गोष्ट आहे ,मात्र त्यानुसार वागायला नुसतं माणूस व्हयला लागत . जात ,धर्म आणि पितृसत्ताक सोडून आणि ते अवघाड असलं तरी ते खऱ्या अर्थाने बुद्धांच्या जवळ जाणारं ,समृद्ध माणूस होणारे आहे .
आणि बुद्ध होण्यासाठी बौद्ध असण्याची गरज नाही . माणूस असणं पुरेसं आहे . आणि या माणसू बनण्याच्या दिशेने प्रत्येक व्यक्तीने समाजानं प्रयत्न करण्याची गरज आहे . या नवविवाहित जोडप्याला पोलिसांनी स्वरक्षण दिलं नाही आणि मुलावर हल्ला होत असताना कुणी मदत केली नाही . हि सारी व्यस्थाच खिळखिळी आहे . आपणही अनेकदा या व्यस्थेचा भाग होत असतो . प्रत्येकाने तपासून पाहायला हवं आपण किती पितृसत्ताक ,जातीवादी पुरुष (स्त्री ) आहोत .
या पोरीचं दुःख समजायला हवं . मात्र त्यासाठी बुद्धाची करुणा अंतःकरणात रुजलेली असायला हवी .