माण तालुक्यात नुकत्याच झालेल्या पावसाने माण नदीला पूर आला असून . माण नदीच्या पात्रा शेजारी असणारी दुकाने वाहून गेली आहेत . नदीकडेला असणाऱ्या शेतामध्ये पाणी घुसून पिकांचे हि नुकसान झाले आहे . नदीला आलेल्या पुरामुळे म्हसवड मधून जाणारी वाहतूक म्हसवड आटपाडी रास्ता ,म्हसवड ते वरकुटे कडे जाणारा रस्ता ,त्याचबरोबर म्हसवड दिंगणजी कडे जाणारे सर्व रस्ते बंद झाले आहेत . पहाटे झालेल्या पावसामुळे नदीकाठी असणाऱ्या टपऱ्या ,चहाची दुकाने व किरकोळ दुकाने वाहून गेली आहेत . हे पाहण्यासाठी लोकांनी सकाळी गर्दी केली होती .माण तालुका हा दुष्काळी तालुका असल्याने एवढा पाऊस कधीच होत नसतो . परतीचा जेवढा पाऊस पडतो त्या पावसावरच वर्षभर लोकांना पाणी पुरत असते .परंतु चालू वर्षांमध्ये कमी दाबाच्या पट्टण्यांमुळे दुष्काळी भागात हि पूर परिस्थिती निर्माण झाली आहे . जी माण गंगा कायम कोरडी असते त्याच माण गंगेला पूर आल्यामुळे नदीकाठी असणाऱ्या लोकांना पूर परीस्थितिला सामोरे जावे लागत आहे . प्रमाणापेक्षा जास्त पाऊस झाल्याने पिकांचे हि मोठ्या प्रमाणार नुकसान झाले आहे .