माझे कुटूंब माझी जबादारी मोहिमेअंतर्गत काटवली ,शिंदेवाडी ,बेलोशी ,राजांनी ,दापवडी व घोटेघर तालुका जावळी या गावांमध्ये तपासणीला सुरवात झाली असून . माझे कुटूंब व माझी जबादारी हि मोहीम १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर व १४ ते २४ ऑक्टोबर या दोन टप्प्यामधे राबवली जाणार असून . पहिल्या टप्प्याला सुरवात झाली आहे . पहिल्या टप्प्यात काटवली ,शिंदेवाडी ,बेलोशी ,रांजणी ,दापवडी व घोटेघर ता .जावळी येथे तपासणी सुरु झाली आहे . या मोहिमेला या गावांमधून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे माहिती ग्रामसेवक धनराज वट्टे व दुर्योधन शेलार यांनी दिली आहे . त्या त्या गावातील आरोग्य सेविका स्वयंसेवक व आशा कर्मचारी यांनी घरोघरी जाऊन माझे कुटूंब माझी जबादारी या मोहिमेची सुरवात केली आहे . या मध्ये आशा ताई ,सारिका रांजणे ,सीमा पाटील ,हर्षदा बेलोसे ,अविनंता जाधव ,सारिका फडतरे ,अंगणवाडी सेविका संगीता सुतार , अरुणा रांजणे ,भारती बेलोशे ,अनुसया रांजणे ,सरपंच सुनिल संकपाळ ,हनुमंत बेलोशे ,धनश्री शिंदे ,मंदा बेलोशे तसेच ग्रामसेवा दुर्योधन शेलार ,धनराज वट्टे आदींनी सहभाग घेतला .
या वेळी बोलताना ग्रामसेवक धनराज वट्टे म्हणाले हे पथक गावातील सर्व कुटूंबातील व्यक्तीची तपासणी करणार असून .सर्व ग्रामस्थांनी यांना सहकार्य करावे . दुर्योधन शेलार म्हणाले कोरोना बाबत लोकांमध्ये जनजागृती व्हावी हा या मोहिमे मागील उद्धेश आहे . या मध्ये मास्कचा वापर ,सॅनिटाझरचा वापर करणे याची जनगागृती करण्यात येणार आहे .