लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली असून महाराष्ट्रातील आणखी २ टप्पयाचें मतदान बाकी आहे . मात्र आत्तापासून कोण किती जागा जिंकणार यावर नवनवीन अंदाज बांधले जात आहेत . अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाविकास आघाडीला महाराष्ट्रात किती जागा मिळतील याचा आकडाच सांगितला आहे . महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मोठे यश मिळेल ,आम्हा सर्वाना मिळून ३० ते ३५ जागा मिळतील ,असा अंदाज शरद पवार यांनी वर्तवला आहे . कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी शरद पवार गुरुवारी साताऱ्यात आले होते . माध्यमांशी बोलताना ते म्हणाले कि ,राष्ट्रवादीच्या विचाराबरोबरच उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला लोक समर्थन देत आहेत . आम्हाला लोकांचा पाठींबा मिळत असल्याने यावेळी आमची संख्या ३० ते ३५ खासदारांच्या आसपास जाण्याची शक्यता आहे .
शिवाजी पार्कवर होणाऱ्या पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरे यांच्या सभेच्या संधर्भात शरद पवार म्हणाले कि ,सभेत काय होतंय ते बघूया . मोदींना कोणा -कोणाची मदत हवी आहे . हे यातून दिसते . त्यांचा आत्त्मविश्वास कुठं गेलाय ,हे हि समजतंय अशा खोचक टोलाही पवारांनी लगावला