राज्यातील ३४ जिल्ह्यामध्ये १२ हजार ७११ ग्रामपंचातीच्या सार्वजनिक निवडणुका पार पडल्या राज्यातील १४२३४ ग्रामपंचातीसाठी निवडणूक जाहीर झाल्या होत्या .मात्र त्यापैकी १५२३ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत . संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भाजपाकडे ३०२३ ग्रामपंचातील आल्या आहेत . तर शिवसेनेकडे २७१३ ,राष्ट्रवादी कडे २६५४ ,काँग्रेस कडे २०२० ,मनसेकडे ३५ तर स्थानिकांकडे २४४९ ग्रामपंचायती आल्या आहेत . राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाल्या नंतर राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी एक महिन्याच्या आतमध्ये सरपंचाचे आरक्षण काढू असे सांगितले .