राज्यात गुरव समाजाची लोकसंख्या ३० लाखाच्या आसपास आहे . त्यात बरेच लोक देवाचे पुजारी असून इनाम वर्ग तीन धारक आहेत . कोरोना काळात त्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे . गुरव समाजाने आझाद मैदान वरती तीन वेळा आंदोलन केले. याबात सरकारने कोणत्या प्रकारची दखल घेतली नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली . शासनाणे गुरव समाजाच्या मागण्या मान्य केल्या नाही तर गुरव समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब शिंदे याच्या नेतृत्वाखाली कोरणाच्या काळात जीव धोक्यात घालून रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा या वेळी देण्यात आला आहे .