Tuesday, March 10, 2026
HomeMain Newsभीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांच्यावर गोळीबार

भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांच्यावर गोळीबार

भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांच्या गाडीवर गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या सहारनपूर येथे त्यांच्यावर गोळीबार झालाय. चंद्रशेखर आझाद गाडीने जात होते. यावेळी त्यांच्यावर अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात चंद्रशेखर आझाद थोडक्यात बचावल्याची माहिती समोर आली आहे. पण आझाद यांना कंबरेला गोळी लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. आझाद यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. संबंधित घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

चंद्रशेखर आझाद यांचा देशभरात मोठा चाहता वर्ग आहे. आझाद काही कार्यक्रमासाठी जात होते. ते ड्रायव्हरच्या बाजूला फ्रंटसीटवर बसले होते. यावेळी त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ते थोडक्यात बचावले. पण त्यांच्या कंबरेला गोळी लागली आहे. तसेच गाडीच्या काचा फुटल्या आहेत. गाडीच्या फ्रंटसीटला गोळीमुळे खड्ड पडलं आहे. संबंधित घटनेनंतर गाडीचा व्हिडीओ समोर आला आहे. त्यामध्ये सगळं स्पष्टपणे दिसत आहे.

चंद्रशेखर हे एका कार्यक्रमासाठी सहारनपूरच्या देवबंद येथे पोहोचले होते. ते त्यांच्या फॉर्चूनर कारने प्रवास करत होते. यावेळी अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात ते जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. संबंधित हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. पोलिसांकडून नाकाबंदी करुन आरोपींचा शोध सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments