Thursday, August 7, 2025
Homeखटावबेकायदेशीर गर्भलिंग निदान करणाऱ्या व्यक्तीला अटक

बेकायदेशीर गर्भलिंग निदान करणाऱ्या व्यक्तीला अटक

सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील औंध येथील कळंबी गावात एक व्यक्ती काळ्या रंगाच्या मोटार सायकलवरून पाठीमागे पिवळ्या रंगाची bag घेऊन संशयीत रित्या फिरत होता .सदर इसमास पोलिसांनी सापळा रचून पकडले असता .त्याच्याकडे सोना स्टार कंपनीचे सोनोग्राफी मशीन सापडले .या मशीन चा उपयोग करून तो गर्भवती महिलांची गर्भनिदान लिंग तपासणी करीत असल्याचे सांगितले .या व्यक्तीचे शिक्षण ९ वी पर्यत झाले असल्याचे पोलीस तपासात समजले .त्याच बरोबर त्याच्याकडे डॉक्टर असलेबाबतची पदवी अथवा गर्भलिंग निदान करण्याबाबतचा परवाना नसल्याचे तपासात उघड झाले . ही सातारा जिल्ह्यातील पहिलीच घटना आहे कि गर्भलिंगनिदान करणाऱ्या मशीनसह एका व्यक्तीला पकडण्यात आले .

पोलिसांच्या तपासा दरम्यान या व्यक्तीकडे सोनोग्राफी मशीन ,मोटार सायकल ,मोबाईल फोन असा एकून २,२६,४००/- रुपयांचा मुदेमाल जप्त करण्यात आला .

सदर कारवाई श्री .संदीप पाटील पोलिस अधिक्षक सातारा ,श्री. विजय पवार अप्पर पोलिस अधिक्षक सातारा ,यांच्या मार्गदर्शनाखाली मा .पदमाकर घनवट पोलिस निरीक्षक,सागर गवसणे ,पोलीस उपनिरीक्षक,पृथ्वीराज घोरपडे ,विलास नागे ,संजय पवार ,जोतीराम बर्गे .पो.ना. मोहन नाचण ,योगेश पोळ,रवी वाघमारे ,राजकुमार ननावरे ,संतोष जाधव ,मोनाली निकम ,प्रवीण कडव ,गणेश कचरे ,मारुती अडागळे,यांनी कारवाईमध्ये सहभाग घेतला .

सदर कारवाई बाबत श्री .संदीप पाटील पोलिस अधिक्षक सातारा ,श्री. विजय पवार अप्पर पोलिस अधिक्षक सातारा ,यांनी अभिनंदन केले .

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments