स्वयंपाक घरात अत्यंत गरजेच्या असलेल्या लसणाचे दर सध्या गगनाला भिडले आहेत. अशातच लसणाचा काळाबाजार करणारे, चक्क सिमेंटचं लसूण विकत आहेत. बाजारात सिमेंटच्या लसणाची विक्री होत आहे. या विचित्र फसवणुकीमुळे ग्राहक आश्चर्यचिकत झाले आहेत.
अकोला शहरातील एका निवृत्त पोलीस कर्मचा-याच्या पत्नीनं घरासमोर आलेल्या फेरीवाल्याकडून पाव किलो लसूण खरेदी केलं. त्यामध्ये हुबेहुब लसणासारख्याच दिसणा-या लसणाच्या गाठी त्यांना दिसल्या. मात्र ती सोलली जात नसल्यानं त्यांनी ती चाकूनं कापली, तेव्हा सिमेंटला पांढरा रंग देऊन तयार केलेली ती बनावट लसूण असल्याचं उघड झालं. वजनात जास्त असल्यानं काळाबाजार करणारे अशी फसवणूक करत आहेत. त्यामुळे ग्राहकांनी सावधानता बाळगणं गरजेचं आहे.