Friday, August 8, 2025
HomeMain Newsबनावट लसीकरण दहशतवादाहून अधिक घातक: ममता

बनावट लसीकरण दहशतवादाहून अधिक घातक: ममता

लसीकरण घोटाळा प्रकरणात अटक करण्यात आलेला देबांजन देब “दहशतवाद्याहून अधिक घातक” आहे अशी टिप्पणी करत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देबवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत.

कोविड-१९साठी बनावट लसीकरण मोहीम राबवण्यात तृणमूल काँग्रेसचा अजिबात सहभाग नाही असे सांगूनममता यांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची भाजपची मागणी फेटाळली आहे.

देबने कोलकाता महानगरपालिकेचे (केएमसी) सहआयुक्त असल्याचा दावा करत लसीकरण शिबीर घेतले व त्यात लोकांना बनावट लशी टोचल्या असा आरोप आहे. या प्रकरणात त्याला गेल्या आठवड्यात अटक करण्यात आली.

यामध्ये राज्य सरकारचा अजिबात सहभाग नाही आणि जनतेला हे माहीत आहे. अनेकदा सभ्य दिसणारे जनतेला फसवतात. मी त्यांना माणूस मानतच नाही. हे लोक मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांच्या खोट्या सह्या करतात. असे लोक दहशतवाद्यांहून अधिक घातक आहेत.”

देबवर आम्ही कडक कारवाई केली आहे. मी कोलकाता पोलिस आयुक्तांशी तीनवेळा बोलले आहे. एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे व तपास चालू आहे. त्याला मदत करणाऱ्या सर्वांवरही कडक कारवाई केली जाणार आहे,” असे ममता यांनी सांगितले. या प्रकरणात केएमसी व पोलिसांना आपली जबाबदारी झटकता येणार नाहीअसेही त्या म्हणाल्या.

भाजपने केलेली सीबीआय चौकशीची मागणी फेटाळून लावतभाजपनेच यापूर्वी राज्यात अनेक लफंग्यांना मदत केली आहेअसा दावा ममता यांनी केला.

देबच्या बनावट शिबिरात ज्या लोकांचे “लसीकरण” झाले आहेत्यांना पुन्हा लशी टोचण्याची गरज आहे की नाही याबाबत निर्णय करण्यासाठी तज्ज्ञ समिती स्थापन करण्यात आल्याचेही ममता म्हणाल्या.

आयएएस अधिकारी असल्याची बतावणी करत कोविड-१९ लसीकरण शिबिर घेतल्याबद्दल पोलिसांनी एका २८ वर्षीय व्यक्तीला २३ जून रोजी अटक केली. याच शिबिरात अभिनेत्री व तृणमूल काँग्रेस खासदार मिमी चक्रवर्ती यांनीही लस घेतली होती. त्यानंतर त्या आजारी पडल्या. त्यांच्याशी बोलल्याचे ममता यांनी सांगितले.

मिमी चक्रवर्ती यांना या शिबिरासाठी निमंत्रित करण्यात आले होते. लसीकरण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एसएमएस न आल्यामुळे त्यांना या शिबिराबद्दल संशय आला आणि त्यांनी पोलिसांना कळवले. नंतर पोलिसांनी देब यांच्या तीन साथीदारांना अटक केली आणि त्यांच्यावर हत्येच्या प्रयत्नासह आयपीसीचे अनेक गुन्हे नोंदवण्यात आले.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments