Friday, August 8, 2025
HomeMain Newsपोलिसांना मारहाण करणाऱ्या आरोपींसाठी भाजप नेते राम कदमांचा फोन

पोलिसांना मारहाण करणाऱ्या आरोपींसाठी भाजप नेते राम कदमांचा फोन

पवईच्या हिरानंदानीजवळ भाजप कार्यकर्त्यांनी पोलिसांना मारहाण केल्याचं प्रकरण चांगलंच चर्चेत आलंय. विशेष म्हणजे पोलिसांना मारहाण करणाऱ्या आरोपींना सोडा, अशी विनंती करणारा फोन भाजपचे नेते आणि आमदार राम कदमांनी ) पोलीस कर्मचाऱ्याला केल्यानं एकच खळबळ उडालीय.

पवई पोलिसांच्या एका कॉन्स्टेबलला भाजप कार्यकर्त्यांकडून मारहाण करण्यात आली होती, या प्रकरणात कार्यकर्त्यांच्या सुटकेसाठी राम कदम यांनी थेट पोलिसांना विनंती करणारा फोन केलाय. राम कदम फोनमध्ये पोलिसांना म्हणतात, ”त्या दिपूने केलं ते ते चूकच आहे. त्याचं समर्थन करू शकत नाही. पण आता ज्या पद्धतीचे कोर्टात केस स्टँड झाल्याचे आपण पाहिलेच आहे. त्याच्या दोन थोबाडीत मारा, पण आपसात ही केस सोडवण्याचा प्रयत्न करा”, अशी विनंती राम कदम यांनी केली. त्यामुळे राम कदमांवर आता चहूबाजूंनी टीका केलीय जातेय.

काय आहे प्रकरण?
पवई पोलिसांच्या एका कॉन्स्टेबलला भाजपच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडलीय. नितीन खैरमोडे असे मारहाण झालेल्या पोलीस कॉन्स्टेबलचे नाव आहे. पवई हिरानंदानी येथे गॅलरिया मॉलजवळ एक ज्येष्ठ महिला डॉक्टरच्या गाडीला ट्रिपल सीट हे कार्यकर्ते जात असताना धडकले होते. यावेळी घटनास्थळी पवई पोलीस दाखल झाले. त्यांनी आरोपी सचिन तिवारी, दिपू तिवारी आणि आयुष राजभरला ताब्यात घेतले. रिक्षाने जात असताना नितीन खैरमोडे या कॉन्स्टेबलला त्या आरोपींनी रिक्षातच मारहाण केली. त्यांच्या तोंडावर आणि गालावर हातातील कडे मारले.

या वेळी नितीन यांच्या तोंडातून रक्त येऊ लागले आणि तेव्हाच या तिघांनी रिक्षातून पळ काढला. मात्र मागून येणाऱ्या पोलिसांनी सचिनला पकडले आणि दिपू आणि आयुष तिथून फरार झाले. सध्या पवई पोलीस या दोघांचा शोध घेत आहे. हे तिघे ही भाजपचे कार्यकर्ते असून, घाटकोपर आणि विक्रोळी परिसरात कार्यरत आहेत. पोलिसांनी त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा, पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण, असे गुन्हे दाखल केले असून, पुढील कारवाई करीत आहेत.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

Recent Comments