परभणी : बारा वर्षा खालील मुलींवर बलात्कार करणाऱ्या दोषींना फाशीच्या शिक्षेची तरतूद करणारे बदल पोक्सो कायद्या अंतर्गत लागू झाल्या नंतर महाराष्ट्रातील परभणी मध्ये पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे .आपल्या आई वडीलासह गावातून सात वर्षाची चिमुरडी परभणी शहरात आली .त्याच्या ओळखीचा 30 वर्षीय तरुण बाजारात भेटला आई वडिलाची नजर चुकवून त्या चिमुरडीचे अपहरण केले .आणि पूर्णा तालुक्यातील एका गावात नेऊन तिच्यावर अत्याचार केले .
दुसरीकडे आई वडिलांनी पोलिसात धाव घेतली आणि आरोपीच्या मुसक्या आवळ्ल्या चिमुकली वर बलात्कार झाल्याचे सिद्ध झाले .आणि फासीची तरतूद केलेल्या नव्या पोक्सो अंतर्गत राज्यातील पहिला गुन्हा दाखल झाला .